ETV Bharat / state

Maharashtra SSC Result 2023 : दहावीचा निकाल 93.83 टक्के, पुन्हा मुलींनीच मारली बाजी

author img

By

Published : Jun 2, 2023, 11:22 AM IST

Updated : Jun 2, 2023, 2:51 PM IST

Maharashtra SSC Result 2023
संग्रहित छायाचित्र

दहावीचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून जाहीर कऱण्यात आला. यावर्षी दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभागाने निकालात अव्वल स्थानी झेप घेतली आहे, तर नागपूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी लागला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 95.87 टक्के लागला. विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा 98.11 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 92.05 टक्के लागल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी

दहावीत मुलींनीच मारली बाजी : बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून या निकालात राज्यातील सगळ्याच विभागात मुलींचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले. आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल या वर्षीही जास्त असल्याचे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

कोकण पुन्हा अव्वल : कोकण विभागाने पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात आपल्या पॅटर्नचा दबदबा निर्माण केल्याचे दिसून आले आहे. बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारत राज्यात पहिला येण्याचा विक्रम केला होता. तोच नावलौकिक कोकण विभागाने कायम ठेवला आहे. दहावीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल असल्याचे दिसून आले आहे.

नागपूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी : दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाने बारावीतही अव्वल येण्याचा मान मिळवला होता. तीच परंपरा कोकण विभागाने कायम ठेवील आहे. मात्र बारावीच्या निकालात मुंबई विभागाचा निकाल सगळ्यात कमी लागला होता. दहावीच्या निकालात मात्र नागपूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी लागला आहे.

तीन वर्षाच्या तुलनेत निकालात घट : दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मात्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यावर्षीच्या निकालात घट झाली आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या दहावीच्या निकालात घट झाल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन उघड झाले आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

  1. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४१ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यातील १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे.
  2. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ३७ हजार ७०४ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६,६४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी २२ हजार ३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ६०.९० आहे.
  3. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २१ हजार २१६ असून २० हजार ५७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी १५ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.२५ आहे.
  4. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८ हजार ३९७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ३१२ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७ हजार ६८८ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.४९ आहे.
  5. इ.१० वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
  6. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (१८.११ % ) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ( ९२.०५%) आहे.
  7. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८२ ने जास्त आहे.


२५ विषयांचा निकाल १०० टक्के टक्के : राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८९ हजार ४५५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ५ लाख २६ हजार २१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत ३ लाख ३४ हजार ०१५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ८५ हजार २१८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील २३ हजार ०१३ माध्यमिक शाळांतून १५ लाक ७९ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ८४४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च - एप्रिल २०२२ चा निकाल ९६.९४ टक्के इतका होता. मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल २०२२ च्या तुलनेत या वर्षी निकाल ३.११ टक्के कमी आहे व मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता मार्च २०२३ चा निकाल १.४७ टक्के कमी आहे.


एटीकेटी सुविधा : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या एक वा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे 'एटीकेटी'ची सुविधा लागू राहील.


विभागीय मंडळनिहाय निकाल : विभागीय मंडळनिहाय निकाल पहिला तर यात कोकण विभाग प्रथम आले असून कोकण विभागाचा निकाल हा 98.11 टक्के लागला आहे.तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभाग असून कोल्हापूर विभागाचा निकाल हा 96.73 टक्के लागला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून पुणे विभागाचा निकाल हा 95.64 टक्के लागला आहे. चौथ्या क्रमांकावर मुंबई विभाग असून मुंबई विभागाचा निकाल हा 94.66 टक्के लागला आहे. तर पाचव्या क्रमांकावर औरंगाबाद विभाग असून औरंगाबाद विभागाचा निकाल हा 93.23 टक्के लागला आहे. सहाव्या क्रमांकावर अमरावती विभाग असून अमरावती विभागाचा निकाल हा 93.22 टक्के लागला आहे. सातव्या क्रमांकावर लातूर विभाग असून लातूर विभागाचा निकाल हा 92.67 टक्के लागला आहे. आठव्या क्रमांकावर नाशिक विभाग असून नाशिक विभागाचा निकाल हा 92.22 टक्के लागला आहे. तर नवव्या क्रमांकावर नागपूर विभाग असून नागपूर विभागाचा निकाल हा 92.05 टक्के लागला आहे. यंदा एकूण निकाल हा 93.83 टक्के लागला आहे.

हेही वाचा -

  1. Naxal Girl Passed 12th : जहाल नक्षली ते 12 वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी, जाणून घ्या राजुला हिदामीची संघर्षकथा
  2. HSC Board Answer Sheet : सर, मी खूप गरीब आहे, मला पास करा; विद्यार्थ्याची उत्तरपत्रिकेत विनंती
  3. ICSE 10th result 2023 : परीक्षेच्या तोंडावर मातृछत्र हरपले, तरीही इशिकाने दहावीत पटकावले 97 टक्के गुण
Last Updated :Jun 2, 2023, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.