ETV Bharat / state

ICSE 10th result 2023 : परीक्षेच्या तोंडावर मातृछत्र हरपले, तरीही इशिकाने दहावीत पटकावले 97 टक्के गुण

author img

By

Published : May 29, 2023, 2:22 PM IST

Updated : May 29, 2023, 6:31 PM IST

इशिका जैन हिने ९७ टक्के गुण मिळवून दिवंगत आईची इच्छा पूर्ण केली. तिने आईच्या निधनांतर खचून न जाता आयसीएसईच्या दहावी परीक्षेत यश मिळविले आहे.

Ishika Jain success  in ICSE 10th board exam
इशिका जैन

आईची इच्छा अखेर पूर्ण केली

मुंबई : आयसीएसई दहावीच्या परीक्षेच्या ऐन तोंडावर आलेली असताना म्हणजेच अंतिम परीक्षेला 27-28 दिवस शिल्लक असताना भुलेश्वर येथील श्री चंद्रप्रभा दिगंबर जैन मंदिर आणि श्री आदेश्वर जैन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण जैन यांच्या पत्नी बरखाबेन जैन यांचे आकस्मिक निधन झाले. मात्र, आईच्या निधनाचे दुःख पचवून, मनावर दगड ठेवून त्यांची कन्या इशिका जैन हिने ९७ टक्के गुण मिळविले. या यशाने तिने दिगंबर जैन समाजात आपला जबरदस्त ठसा उमटविला. दिवंगत आईची इच्छा पूर्ण केल्याबद्दल इशिकावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.


प्रवीण जैन आणि दिवंगत बरखाबेन जैन यांची कन्या इशिका जैन हिने आयसीएसई परीक्षा देण्याची तयारी केली. याच परीक्षेच्या ऐन तोंडावर इशिकाच्या मातोश्री बरखाबेन जैन यांचे आकस्मिक निधन झाले. आईच्या निधनाने कुटुंबावर कोसळलेला दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही इशिकाने मनाचा दृढ निश्चय करुन परीक्षा दिली. नुकताच आयसीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. संकटाचा सामना करणाऱ्या इशिकाने चक्क ९७ टक्के गुण मिळवून आपल्या स्वर्गीय आईचे स्वप्न पूर्ण केल. वडिलांची मान ही अभिमानाने उंचावली आहे.

आई गेल्याचे दु:ख उराशी : इशिकाला दहावीची परीक्षा तोंडावर आलेली असताना प्रचंड अभ्यास आणि परीक्षेच्या पेपरचे टेन्शन होते. आई-वडील आणि शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझे तिच्यावर होते. त्यातच परीक्षा तोंडावर आलेली असतानाच अचानक आईचे निधन झाले. त्यामुळे अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, बोर्डाच्या परीक्षेत मुलीने शिखर गाठावे. उत्तम यश मिळवून उज्ज्वल भविष्याची कवाडे उघडावीत, असे आईलाही वाटत होते.

स्वर्गातील आईला आनंद मिळवून दिला: आई गेल्याचे दु:ख उराशी बाळगून तिने जिद्दीने अभ्यास केला. तिने तब्बल ९७ टक्के गुण मिळवून भरघोस यश संपादन केले आहे. दुःखाचे ओझे मनावर असूनही इशिकाने अत्यंत चांगले गुण मिळवून स्वर्गातील आईला आनंद मिळवून दिला असल्याचे मनोगत इशिका जैन हिने ईटीव्ही भारतकडे व्यक्त केले आहे. इशिकाला पुढे वाणिज्य शाखेतून शिक्षण घ्यायचे आहे. एचआर किंवा जय हिंद कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा-

  1. Transgender Success Story: तृतीयपंथीय म्हणून मिळणाऱ्या टोमण्यांना सेजलने दिले उत्तर, बारावीत मिळविले प्रेरणादायी यश
  2. HSC Result 2023 : वडिलांची अपेक्षा 85 टक्क्यांची, दिव्यांग सौरवने मिळवले 88 टक्के
Last Updated : May 29, 2023, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.