ETV Bharat / state

स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहराची 'हॅट्रिक'; देशात मिळवला तिसरा क्रमांक

author img

By

Published : Aug 21, 2020, 1:59 AM IST

Updated : Aug 21, 2020, 2:29 AM IST

लोणावळा शहर हे आधीच पर्यटनस्थळ आहे, त्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात तिसरा क्रमांक मिळवल्याने लोणावळा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ३ हजार 898 आणि 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

Lonavala city
स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहराची 'हॅट्रिक

पुणे - पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये देशात तिसरा क्रमांक पटकावत 'हॅट्रिक' साधली आहे. सलग तीन वर्षे हा पुरस्कार लोणावळा नगरपरिषदेने मिळवला आहे. हा पुरस्कार लोणावळा शहरातील नागरिकांच्या सहकार्याने मिळाला असून पुढील वर्षी पहिला क्रमांक पटकावू, असा विश्वास लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेख जाधव यांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव पुरस्कार मिळाल्यानंतर ईटीव्हीशी बोलताना
लोणावळा शहर हे आधीच पर्यटनस्थळ आहे, त्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात तिसरा क्रमांक मिळवल्याने लोणावळा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ३ हजार 898 आणि 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या 544 शहरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यात लोणावळा शहराने तिसरा क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, या अगोदर 2018 ला 7 वा, 2019 ला दुसरा तर यंदा 2020 ला तिसरा क्रमांक मिळवत 'हट्रिक' साधली आहे. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या म्हणाल्या की, साडेतीन वर्षांमध्ये लोणावळा नगरपरिषदेने खूप काम केली आहेत. लोणावळा नगर परिषदेला तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदा काही सुविधा नसताना 7 वा क्रमांक मिळवला. त्यानंतर दुसरा आणि आता हॅट्रिक साधत तिसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी चौथा क्रमांक यायलाच हवा त्या अनुषंगाने कामे सुरू केली होती. 'लोणावळा शहराची वाईट परिस्थिती होती, डम्पिंग ग्राउंड नव्हतं, शहर कचराकुंडीमुक्त केलं. प्रत्येक घरातील कचऱ्याच नियोजन केले. डस्बीनचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना स्वच्छतेची आवड निर्माण झाली. लोणावळा शहरातील भिंती सामाजिक संदेश देत बोलक्या केल्या. तसेच, मुख्यधिकारी सचिन पवार यांचे देखील मोलाच सहकार्य आहे. दुसरा क्रमांक मिळवला असून 15 कोटी रक्कम लोणावळा नगरपरिषदेला मिळणार आहे, असे त्या म्हणाल्या.
Last Updated : Aug 21, 2020, 2:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.