ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या धडकेने बिबट्या ठार

author img

By

Published : Nov 28, 2019, 9:58 AM IST

Updated : Nov 28, 2019, 3:17 PM IST

दौंड तालुक्यातील पाटस येथे रात्रीच्या बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला.

dead leopard
मृत बिबट्या

पुणे - दौंड तालुक्यातील पाटस येथे रात्रीच्या बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्यास ताब्यात घेतले.

बिबट्या ठार

काल (बुधवारी) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाटस येथील टोल नाक्याजवळ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून तळाजवळच्या शितोळे वस्तीत बिबट्या गेला असल्याची माहिती, एका प्रवाशाने स्थानिक नागरिकांना दिली होती. त्यानंतर शितोळे वस्तीतील नागरिकांची याची माहिती वनविभागाला दिली होती.

वनविभागाचे कर्मचारी सकाळी बिबट्याची पाहणी करण्यासाठी येणार होते. पण, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाटस टोलनाक्यापासून जवळच्या अंतरावर एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्या ठार झाला. याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले होते. रात्री बाराच्या सुमारास पाटस पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी हजर झाले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी नेले. बिबट्याचे शवविच्छेदन झाल्याची माहिती वरवंड वनपरिक्षेत्राचे वनपरीमंडल अधिकारी सय्यद रज्जाक यांनी सांगितले.

हेही वाचा - भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ, सांगवी पोलिसात गुन्हा दाखल

Intro:nullBody:पाटस येथे पुणे - सोलापूर महामार्गावर वाहनांच्या धडकेने बिबट्या ठार

दौंड

दौंड तालुक्यातील पाटस येथे रात्रीच्या बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका वाहनाने बिबट्याला धडक दिल्याची घटना घडली .या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला .
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृत बिबट्यास ताब्यात घेतले आहे .

काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाटस येथे टोल नाक्या नजीक पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून बिबट्या तळ्याजवळच्या शितोळे वस्ती येथे गेल्या असल्याची माहिती एका प्रवाशाने स्थानिक नागरिकांना दिली होती .
शितोळे वस्ती परिसरात बिबट्या आला असल्याच्या माहितीने शितोळे वस्ती परिसरातील नागरिक रात्री भीतीच्या छायेत होते . याबाबत नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली होती . वनविभागाचे कर्मचारी सकाळी बिबट्याची पाहणी करण्यासाठी येणार होते .

परंतु रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाटस टोलनाक्यापासून जवळच्या अंतरावर एका वाहनाने बिबट्या ला धडक दिली या धडकेत बिबट्याच्या मागील बाजूस वाहनाची धडक बसली . वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती कळताच मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाले होते .रात्री बाराच्या सुमारास पाटस पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी हजर झाले होते . वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यास मृत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नेले . बिबट्याचे शवविच्छेदन झाले असल्याची माहिती वरवंड वनपरिक्षेत्रा चे वनपरीमंडल अधिकारी सय्यद राज्जाक यांनी सांगितले .Conclusion:null
Last Updated : Nov 28, 2019, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.