ETV Bharat / state

जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींवर टीका; पुण्यात 'अजित पवार काॅफी टेबल' पुस्तकाचे प्रकाशन

author img

By

Published : Nov 3, 2022, 5:18 PM IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ( Jayant Patil Criticised PM Modi ) पुण्यात सडकून टीका ( Ajit Pawar Coffee Table Book was Released in Pune ) केली. ( Many Leaders of NCP were Present on This Occasion ) अजित पवार काॅफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाषण करताना भाजपच्या कार्यपद्धतीवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींवर टीका
Jayant Patil Criticised PM Modi

पुणे : पुण्यात अजित पवार काॅफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात ( Ajit Pawar Coffee Table Book was Released in Pune ) आले. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते ( Many Leaders of NCP were Present on This Occasion ) उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हासदादा पवार, यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाषण करताना भाजपच्या कार्यपद्धतीवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका ( Jayant Patil Criticised PM Modi ) केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका : "पश्चिम बंगालमध्ये पूल पडला, तर त्या ठिकाणी जाऊन अतिशय विखारी भाषण करणारे, गुजरातमध्ये पूल पडला तर गप्प बसणारे नेते आपण बघितले. पश्चिम बंगालमध्ये पूल पडल्यानंतर विखारी भाषण करणारे पंतप्रधान मोदी ( Prime Minister Narendra Modi ) आणि गुजरातमधला पूल पडल्यानंतर 140 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर मला राजकारण करायचे नाही, असे म्हणणारे राहुल गांधी हा विचारातला फरक आहे. असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुण्यात टीका केली आहे.

अजितदादांनी ठरवले तर सत्ता बदल होतो : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात अजितदादा पवार यांच्या जीवनपटावर आधारित काॅफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मी आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्रात ठरवले की सत्ता बदल होतो, याचा आम्हाला अनुभव आहे.

कार्यकर्त्यांना काहीही देता न आल्याची खंत : अडीच वर्षे आमचे सरकार होते. परंतु, आमचा मुख्यमंत्री नसल्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना काहीही देऊ शकलो नाही. कार्यकर्त्यांना केव्हा देऊ शकतो ज्यावेळेस आपण आपला माणूस हा मुख्य स्थानी असतो. त्यामुळे अडीच वर्षांत कार्यकर्त्यांनाही काहीही देता न आल्याचे खंत यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

अजित पवारांच्या सिंचन घोट्याळ्यावरील टीकेला प्रतिउत्तर : अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर मोठी टीका झाली. परंतु, जे काम झाले त्याची गुंतवणूक केल्यामुळे माझे मोठे मोठे आहेत आम्ही प्रचंड काम केले आणि त्या कामावरच ही सगळे कामे उभी आहेत, असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले आहेत. एस. एम. जोशी सभागृहात पुण्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 'अजित पवार कॉपी टेबल' नावाचे हे पुस्तक आहे. त्या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हासदादा पवार तसेच जयंत पाटील उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.