ETV Bharat / state

International Womens Day : देहविक्रीचा व्यवसाय सोडून आता 'त्या' महिला वळल्या बुधवार पेठेतील स्वच्छतेच्या कामाकडे

author img

By

Published : Mar 5, 2023, 6:24 PM IST

Updated : Mar 5, 2023, 8:18 PM IST

पुण्यातील बुधवार पेठ येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला. लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या काळात नुकसान झाल्याने या महिलांना आर्थिक फटका बसला. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान आणि त्यानंतर कामावर पडलेला फरक यामुळे बुधवार पेठेतील तब्बल 17 महिलांनी स्वच्छतेच्या कामाला सुरवात केली.

mahila din
महिला दिन विशेष

17 महिला 'तो' व्यवसाय सोडून आज करत आहेत स्वच्छतेचे काम

पुणे : बुधवार पेठेत जवळपास 3 हजारहून अधिक महिला या वैश्याव्यवसायाचे काम करतात. या महिलांसाठी काम करणारी एकमेव संस्था म्हणजे सहेली संस्था आहे. या संस्थेत जवळपास 2200 हून अधिक महिलांची नोंदणी आहे. या महिलांच्या विविध प्रश्नावर ही संस्था काम करत असते. जेव्हा लॉकडाऊन लागले तेव्हा समाजातील विविध घटकांकडून तसेच या संस्थेकडून या महिलांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. मात्र अश्या वेळेस या महिलांना मोठा आर्थिक फटका बसला. तेव्हा या संस्थेकडे नोंदणी केलेल्या काही महिलांनी संस्थेकडे वेगळ्या कामाची मागणी केली. आज पाहता पाहता या उपक्रमात 17 महिलांनी सहभाग घेतला आहे. आज ते या परिसरात स्वच्छतेचे काम करत आहेत.


क्लिन रेड स्वच्छतेतून रोजगार : पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये 'क्लिन रेड' हा एक वेगळा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. इथे याआधी एचआयव्ही जागृतीचे, पीअर एज्यूकेटरचे काम केलेल्या स्त्रिया आता वस्ती सफाईचे आणि कचरा व्यवस्थापनाचे काम करू लागल्या आहेत. वस्तीतल्या स्त्रियांसोबत दोन दशकांहून अधिक काळ काम करणारी वैश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची एकमात्र संघटना 'सहेली एचआयव्ही/एड्स कार्यकर्ता संघ' आणि सोबत कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी 'स्वच्छ सहकारी संस्था' व 'एएसआर सर्व्हिसेस' ही बांधकाम क्षेत्रातील कंपनी यांचे संयुक्त पाठबळ लाभलेल्या उपक्रमाची ही ओळख आहे.


कोविडची पार्श्वभूमी : 'क्लिन रेड'चे बीज कोविडकाळात रुजले. एरवीही आपला समाज बुधवार पेठेपासून अंतर राखून असतो. लॉकडाऊन नियमांमुळे तर सामाजिक अंतर अधिकच वाढले. कोविड निर्बंधांमुळे महिलांची कामे थांबले होते. ते पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत नव्हती. तेव्हा सरकारी वा बिगर-सरकारी मदतीवर किती दिवस काढणार हा प्रश्न त्यांना सतावू लागला. वस्तीबाहेर राहणाऱ्या आणि धुणीभांडी वा अन्य घरकामे करणाऱ्या काही जणींची कामेही या काळात गेली. तर याच काळात काहींनी आधीची कामे सोडून वेगळी काम करायचे हे ठरवले. नुसती मदत नको, काम हवे अशी मागणी या महिला 'सहेली' कडे करू लागल्या. मग आम्ही विविध संस्था संघटनेच्या मदतीने या भागात स्वच्छतेचा काम सुरू केले आहे. असे यावेळी सहेली संस्थेच्या अध्यक्षा तेजस्वी सेवेकरी यांनी सांगितले आहे.


स्थानिक गरज : जेव्हा या महिलांनी मागणी केली की आम्हाला मदत नव्हे तर हक्काचे काम हवे, तेव्हा या मागणीची पूर्तता करणारी रोजगाराची एक कल्पना सहेली संघाकडे आधीपासून होती. जी स्थानिक भागातल्या एका महत्त्वाच्या गरजेला उद्देशून होती. बुधवार पेठेतल्या विशेषतः वैश्याव्यवसायाच्या पाच-सहा गल्ल्यांमधील कचरा व्यवस्थापन हा दीर्घ काळ दुर्लक्षित विषय होता. किंबहूना इथल्या कचरा व्यवस्थापनाची स्थिती या ठिकाणच्या महिलांसारखीच दुर्लक्षित राहिली होती. पुणे शहरात प्रत्येक वसाहतीमध्ये महानगरपालिकेची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा पोहोचते. तशीच ती बुधवार पेठेतही आहे. मनपा गाडी कचरा उचलायला सकाळच्या वेळेत येते. इथल्या लोकांचा दिवसच दुपारी सुरू होतो. त्यामुळे गाडीच्या वेळात सर्वसाधारण रहिवासी सोडता अन्य घरातून कचरा दिला जाऊ शकत नाही.

एएसआरचे पाठबळ : या पूर्ण परिसराच्या स्वच्छतेचे काम मनपाने केवळ तीन कामगारांवर सोपवलेले होते. संपूर्ण कचरा उचलणे हे त्यांच्याही आवाक्याबाहेरचे काम होते. परिणामी कचरा उचलला जात नाही. अरूंद रस्ते, जुने वाडे, निमुळते जिने इत्यादी अनेक साफसफाईच्या आड येणाऱ्या व्यावहारिक समस्याही होते. बुधवार पेठेचा परिसर भौगोलिकदृष्ट्या जुन्या पुण्यातल्या अन्य भागांसारखाच असला तरी इथे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ जास्त आहे. साहजिकच कचरा तयार होण्याचे प्रमाणही अन्य भागांपेक्षा जास्त आहे. कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था ही इथली एक प्रलंबित निकड होती. ती भागवण्याच्या आणि महानगरपालिकेच्या सेवांना हातभार लावण्याच्या उद्देशाने 'क्लिन रेड'ची आखणी झाली. सहेली संघाच्या या कल्पनेला एएसआरचे पाठबळ मिळाले आणि कामाला सुरुवात झाली.


मदत नव्हे तर काम हवे होते : या कामाबाबत इथल्या महिला सांगतात की याच परिसरात गेले अनेक वर्ष आम्ही वैश्याव्यवसाय केला आहे. पण जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा खूप कठीण गेल. कारण मुले होती. काम नव्हते करायचे काय ? हा प्रश्न होता. तेव्हा आम्ही सहेली संस्थेकडे मागणी केली की आम्हाला मदती पेक्षा हक्काचे काम हवे ? तेव्हा संस्थेने हे स्वच्छतेचा काम दिले. सूरवातीला पहिले दोन महिने अवघड गेले कचऱ्यात हात घालताना घाण वाटली पण एकदा ते काम म्हणून स्वीकारले आणि सगळी काळजी घेऊन करायचे ठरवल्यावर अवघड गेले नाही. असे यावेळी एका महिलेने सांगितले.


टीम क्लिन रेड : कचरा व्यवस्थापनासाठी गल्ल्यांप्रमाणे टीम केल्या आहे. ज्या घरोघरी जाऊन कचरा उचलतात. जिने व रस्ते साफ करतात. जमा केलेला ओला व सुका कचरा गाडीने वाहून नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. सुरुवातीला मोजक्या चार गल्ल्यांपासून सुरू झाले हे काम आता भोई गल्ली, मरगी गल्ली, दाणे आळी, दत्त मंदीर एरिया, बाटा गल्ली, ढमढेरे गल्ली अशा सहा ठिकाणी सुरू आहे. या सर्व भागांत मिळून २३ जणं काम करताहेत. यापैकी पंधरा जणी सहेली संघशी जोडलेल्या, पाच स्वच्छचे कर्मचारी आणि दोन ड्रायव्हर सुपरवायझर एएसआरमधून असे सर्वजण वेगवेगळ्या संस्थेचे असले तरी त्यांची टीम एक आहे. हे पगारी काम असल्याने त्याला वेळेची व अन्य नियमांची शिस्त आहे. कामाचा दिनक्रम ठरलेला आहे.


अस असत काम : टीम क्लिन रेड ४५० हून अधिक घरांतून आणि शंभरहून अधिक लहान-मोठ्या दुकानातून कचरा संकलन करते. घरे, दुकाने आणि रस्त्यांवरून मिळून रोज ८०० ते ९०० किलो ओला व सुका कचरा उचलला जातो. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ कामाची वेळ असून सकाळच्या वेळात कचरा संकलन तर संध्याकाळी रस्ते सफाईचे काम चालते.


'क्लिन रेड' उपक्रम : सहेली, स्वच्छ आणि एएसआर या तिघांच्या एकत्रित कामांतून उभा राहिलेला हा उपक्रम आहे. प्रत्येक संस्थेच्या क्षमतांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्वच्छतेमुळे टीमला कचरा व्यवस्थापनाच्या कामाची समज मिळाली. एएसभारने प्रशासकीय व कार्यालयीन बाबींची शिस्त आणली. शिवाय समुदायातील महिलांच्या गरजा, परिस्थिती संवेदनशीलतेने समजून घेतली. कामाचे तास, वयोमर्यादा इत्यादी अटींमध्ये शिथिलता आणली. चोख कचरा व्यवस्थापनामुळे वस्तीचा परिसर अधिक स्वच्छ झाला आहे. इथे भेट देणारे महानगरपालिका अधिकारीही या बदलाची नोंद घेतायेत.

हेही वाचा : International Women's Day 2023 : देशाच्या राजकारणातील 'या' आहेत सर्वात यशस्वी महिला, ज्या सदैव स्मरणात राहतील

Last Updated : Mar 5, 2023, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.