ETV Bharat / state

Murder: धक्कादायक! जादूटोणा करते म्हणत दिराकडून वहिनीची गळा चिरून हत्या

author img

By

Published : Nov 12, 2022, 9:55 AM IST

Updated : Nov 12, 2022, 3:06 PM IST

पुण्यातील चंदन नगर भागामध्ये एका दिराने आपल्या स्वतःच्या वहिणीचा जादूटोणा करते म्हणून खून ( In Law Brother Killed Sister In Law In Pune ) केला. आईला भेटू देत नाही ती करणी करते ( In Law Brother Allegedly Not Allowed Meet Mother ) असे म्हणून तिचा गळा चिरून खून केला .

Murder In Pune
वहिनीची गळा चूिरून हत्या

पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील चंदन नगर भागामध्ये एका दिराने आपल्या स्वतःच्या वहिणीचा जादूटोणा करते म्हणून खून ( In Law Brother Killed Sister In Law In Pune ) केला. आईला भेटू देत नाही ती करणी करते ( In Law Brother Allegedly Not Allowed Meet Mother ) असे म्हणून तिचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी चंदन नगर येथे राहणारा श्रीनिवास श्रीराम याला अटक केली आहे. ज्या महिलेचा खून झालेला आहे तिचं नाव लक्ष्मीबाई श्रीराम असे असून या दोघांचं नातं हे दिर भावजयाचा आहे.

वहिनीची गळा चिरून हत्या

जादूटोणा करते म्हणून खून : याबाबत सविस्तर माहिती असे की अटक केलेला आरोपी श्रीनिवास श्रीराम हे अगोदर बिडी कामगार वसाहतीत राहत होते. नंतर ते वेगळे रहायला लागले. आई तुळजाभवानीची परडी घेऊन वहिणी जोगवा मागत होती. एका ठिकाणी त्यांचा परडी भरण्याचा कार्यक्रम आहे म्हणून या महिलेला बोलवून घेण्यात आलं त्या ठिकाणी दीर सुद्धा होता आणि त्या कार्यक्रमांमध्ये त्या घरातील व्यक्तींना बाकीचे सामान आणण्यासाठी तुम्ही बाहेर जावा असे सांगितले. त्यानंतर दारू पिऊन वहिणीचा गळा चिरून खून केला. त्या खोलीमध्ये दोघेच असल्याने दुसरे कोणीही तिथे नव्हते. असे पोलिसांकडून सांगण्यात आले ( Accused Arrested By Pune Police ) आहे. पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतले असून त्या महिलेचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेला आहे.

जादूटोणाविरोधी कायदा : महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा पुरोगामी महाराष्ट्र असे कितीतरी म्हणत असले तरी करणी, जादूटोणा यांचे समाजातले अंतर कमी होताना दिसत नाही. त्यावरून कुटुंबामध्ये सुद्धा खून करण्याची घटना घडत आहे. त्यामुळे हे सर्व धक्कादायक आहे.

Last Updated : Nov 12, 2022, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.