ETV Bharat / state

मानाच्या पाचही गणपतींना पुणेकरांनी साश्रूनयनांनी दिला निरोप

author img

By

Published : Sep 12, 2019, 12:46 PM IST

Updated : Sep 12, 2019, 6:44 PM IST

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षानुवर्षे झाले या शहरात अनेक मंडळे वेगवेगळे उपक्रम राबत हा उत्सव साजरा करतात. पुण्यातील गणेशोत्सवामध्ये ५ मानाच्या गणपतींना एक वेगळे स्थान आहे. या पाचही गणपतींना पुणेकरांनी ओल्या डोळ्यांनी निरोप दिला. या पुण्यातील मानाचे गणपती...

हे आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती

पुणे - पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षानुवर्षे झाले या शहरात अनेक मंडळे वेगवेगळे उपक्रम राबत हा उत्सव साजरा करतात. पुण्यातील गणेशोत्सवामध्ये ५ मानाच्या गणपतींना एक वेगळे स्थान आहे. या पाचही मानाच्या गणपतींना पुणेकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

पाहुया पुण्यातील मानाचे गणपती...

१) कसबा गणपती
कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत.

२) तांबडी जोगेश्वरी

तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झालं आहे. कसबा गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते.


३) गुरुजी तालीम मंडळाचा गणपती
या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. सुरुवातीला हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला.


४) तुळशीबागेतला गणपती
पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.


५) पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती
केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते.

Intro:Body:

NEWS


Conclusion:
Last Updated : Sep 12, 2019, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.