ETV Bharat / state

पिंपरीत पतीने केली पत्नीच्या प्रियकराची सिनेस्टाईलने हत्या; मृतदेहासोबत केले असे काही

author img

By

Published : Nov 4, 2021, 10:45 AM IST

Updated : Nov 4, 2021, 3:45 PM IST

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे  पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने विवाहितेच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेह दारुच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला.

husband kills wife's boyfriend in Pimpri
पिपंरीत पतीने केली पत्नीच्या प्रियकराची सिनेसाईलने हत्या; मृतदेहासोबत केले असे काही

पिंपरी चिंचवड - पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबधन येथे पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हत्या केल्या न चित्रपटाच्या थराराप्रमाणे आरोपीने मृतदेह हा हातभट्टीमध्ये टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र हिंजवडी पोलिसांनी या खुनाचा उलगडा करून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

असा बनवला बनाव -

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने विवाहितेच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेह दारुच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला. मृतदेह संपूर्णपणे जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरला आणि जवळ असलेल्या नाल्यात टाकला. जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल होईल.

तिघांना अटक -

मात्र हिंजवडी पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत तिघा जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पती लंकेश रजपुत उर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन तानाजी रजपुत यांना पोलिसांनी अटक केली आहे.

असा घडला सिनेस्टाईल थरार -

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथील भरत उर्फ भुषण शंकर चोरगे (वय 27, रा. बावधन बु. पुणे) याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी त्या तरुणाने त्या महिलेला रात्री दोन मिसकाॅल दिले. त्यावेळी महिलेच्या पतीने मिसकॉल पाहिल्यावर पत्नीला विचारणा करून तिला मारहाण केली. मारहाण केल्याने महिला पळून गेली. दरम्यान संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर मयत भुषण चोरगे त्याठिकाणी महिलेस भेटण्यासाठी आला. संबंधीत व्यक्ती आल्याचे कळताच महिलेच्या पतीने व त्याचे दोन साथीदार यांनी मिळून त्याला मारहाण करून त्याला धारधार शस्त्राच्या सहाय्याने छातीवर व पोटात वार करुन त्याचा खून केला. मृतदेह बोलेरो गाडीत घालून बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी उरवडे गावात असलेल्या त्याच्या दारुच्या भट्टीमध्ये त्याला रात्रभर जाळले. मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख व इतर अवशेषाची घोटावडे परीसरातील नदीवर व नाल्यात टाकून विल्हेवाट लावली. त्यानंतर त्याचा एक खुनामध्ये सहभागी नसलेला सहकारी सचिन राजपुत यास मयत भुषण चोरगे याची बॉडीची राख व अवशेष पोत्यात भरुन उरवडे येथील एका नाल्यात टाकली आहे असे सांगून मुख्य आरोपी मध्यप्रदेश येथे पळून गेले.

हेही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Last Updated : Nov 4, 2021, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.