ETV Bharat / state

पुण्यात गटारी साजरी करण्यासाठी कोंबड्या पळविल्या, घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Aug 2, 2021, 5:22 PM IST

Updated : Aug 2, 2021, 5:46 PM IST

श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आखाड पार्ट्या साजऱ्या केल्या जात आहेत. अशात हडपसर परिसरातील हिंगणेमळा एका चिकन विक्रेत्याच्या तब्बल वीस कोंबड्या चोरल्या आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

file photo
संग्रहीत छायाचित्र

पुणे - श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आखाड पार्ट्या साजऱ्या केल्या जात आहेत. मटन, चिकन दुकानांकडे वर्दळ वाढली आहे. अशातच आता पुण्यातून कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका चिकन विक्रेत्याचे कोंबड्या ठेवलेल्या पिंजऱ्याचे कुलूप तोडून वीस गावरान कोंबड्या चोरून नेल्या आहेत. त्यामुळे आखाड साजरी करण्यासाठी चोरट्यांनी कोंबड्याचे चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. 1 ऑगस्ट) पहाटे घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पुण्यात गटारी साजरी करण्यासाठी कोंबड्या पळविल्या

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हडपसर परिसरातील हिंगणेमळा येथे अस्लम इस्माईल शेख या चिकन विक्रेत्याचे दुकान आहे. रविवार असल्यामुळे त्याने शनिवारीच गावरान कोंबड्या खरेदी करून त्या पिंजऱ्यात भरून ठेवल्या होत्या. सकाळी येऊन पाहिले असता अज्ञात व्यक्तीने पिंजऱ्याचे कुलूप तोडून वीस कोंबड्या चोरून नेल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, या चिकन विक्रेत्याच्या दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या सीसीटीव्हीमध्ये तीन अज्ञात चोरटे कुलूप तोडून पोत्यामध्ये कोंबड्या भरताना कैद झाले आहेत. दरम्यान, मला माझ्या कोंबड्या मिळवून द्याव्यात यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे.

हेही वाचा - 'त्या' तरुणीचे आत्महत्येचे कारण झाले स्पष्ट, ऑनलाइन अभ्यासाच्या तणावातून ही घटना घडल्याचे कुटुंबीयाचे स्पष्टीकरण

Last Updated : Aug 2, 2021, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.