ETV Bharat / state

गुजरातमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपीला पुण्यातून अटक

author img

By

Published : Mar 24, 2021, 10:31 AM IST

अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्टेशनमध्ये 19 फेब्रुवारी 2006 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणातील 12 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली होती. मोहसीन शेख हा यातील तेरा आरोपी आहे. तर यातील दहा आरोपींचा शोध अजूनही सुरूच आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.

बॉम्ब स्फोटातील आरोपीला पुण्यातून अटक
बॉम्ब स्फोटातील आरोपीला पुण्यातून अटक

पुणे - 2006 सली गुजरातच्या अहमदाबादमधील कालुपूर मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील एका आरोपीला दहशतवादविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मोहसीन पूनावाला असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील वानवडी परिसरातून गुजरात एटीएसच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा त्याला राहत्या घरातून अटक केली आहे.

अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्टेशनमध्ये 19 फेब्रुवारी 2006 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणातील 12 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली होती. मोहसीन शेख हा यातील तेरा आरोपी आहे. तर यातील दहा आरोपींचा शोध अजूनही सुरूच आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे.

दरम्यान मोहसीन शेख हा दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमध्येही जाऊन आला होता. पुण्यात राहत असताना त्याने सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अनेक घरे बदलली होती. तो घरातून खूप कमी वेळ बाहेर पडायचा. घराजवळच असलेल्या एका मदरशांमध्ये तो शिकवणी घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.