ETV Bharat / state

राम मंदिर बांधल्यानंतरही ते उद्ध्वस्त करण्याचा तुकडे तुकडे गॅंगचा मनसुबा - गोविंद गिरी महाराजांचं मोठं वक्तव्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 11:02 PM IST

Govindgiri Maharaj
गोविंद गिरी महाराजांचे मोठं वक्तव्य

Govindgiri Maharaj on Ram Temple : राम जन्मभूमी आयोध्या येथे भव्य असे राम मंदिर सध्या उभ केले जात आहे. या अगोदर राम मंदिर पाडून त्या ठिकाणी मशिद बांधली होती. त्यानंतर मशिद पाडून राम मंदिर (Ram Temple) बांधण्यात येत आहे. राम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट कोषाअध्यक्ष महंत गोविंद गिरीदेव महाराज (Govindgiri Dev Maharaj) यांनी बांधण्यात येणाऱ्या मंदिरं बाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पुणे Govindgiri Maharaj on Ram Temple : पुण्यात आज 'दो धागे श्री राम के लिए' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्या भाषणात गोविंद गिरीदेव महाराज यांनी बोलताना एक भीती व्यक्त केली आहे. गोविंद गिरीदेव महाराज (Govindgiri Dev Maharaj) म्हणाले की, भव्य असे राम मंदिर (Ram Temple) उभा करत आहोत. परंतु, राम मंदिर फक्त उभे करून चालणार नाही. तर रामाचं कार्य आणि राम मंदिराचं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे.



केवळ रामाचं मंदिर उभा करून चालणार नाही : यापूर्वी हजारो वर्षांपूर्वी आपली मंदिरे पाडण्यात आली. सातत्याने ही मंदिरं काही वर्षांनी पाडण्यात येतात का? उद्ध्वस्त का होतात. याची कारण मीमांसा करावी लागेल. रामाची प्रतिष्ठापना करून आणि मंदिर पूर्ण बांधून चालणार नाही अशा पद्धतीची मंदिरं पुन्हा पुन्हा का तोडली गेली? का उद्ध्वस्त केली गेली याची कारण मीमांसा होणे आवश्यक आहे. हे मंदिर (अयोध्येतील राम मंदिर) (Ayodhya Ram Temple) जेव्हा उभे होत आहे त्याच वेळेला अनेक लोकांचे मनसुबे असे आहेत की, मंदिर उभे तर होऊ द्या. ज्याप्रमाणे जुनी मंदिरं नेस्तनाबूत झाली तशाच प्रकारचं काहीतरी याही मंदिराकरता करावं. अशा प्रकारची टुकडे टूकडे गॅंगची किंवा अशी मनोवृत्ती असलेली काही मंडळी आहेत. त्या सर्वांना जरब निर्माण करण्याकरता केवळ रामाचं मंदिर उभा करून चालणार नाही तर, समर्थ राष्ट्र मंदिर उभा करण्याची गरज आहे. हे राष्ट्र बलशाली झालं पाहिजे. असं गोविंद गिरीदेव महाराज म्हणाले.


दो धागे श्री राम के लिए : पुण्यातील मॉर्डन कॉलेज मैदानावर सामाजिक कार्यकर्त्या अनघा घैसास यांच्या संयोजनातून 'दो धागे श्री राम के लिए' (Do Dhaage Shriram Ke liye Program Pune) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात गोविंद गिरीजी महाराज यांनी हे वक्तव्य केलं आहे. गोविंद गिरीजी महाराज हे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्याचे कोषाध्यक्ष आहेत. म्हणून त्यांच्या या वक्तव्याकडे अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहिले जात आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक आणि श्री राम मंदिर ट्रस्टचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , उपसभापती नीलम गोर्हे (Neelam Gore), अनघा घैसास यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला जेपी नड्डा हजेरी लावणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्याचं आयोजकांनी पूर्वीच कळवलं होतं.


हेही वाचा -

  1. पुण्यात 'दो धागे श्रीराम के लिए' कार्यक्रम; खुर्च्या मात्र रिकाम्याच, गर्दी नसल्यानं स्मृती इराणी मंचावरून परतल्या
  2. श्रीराम मंदिर लोकार्पणानंतरही बांधकामासाठी आणखी तीन वर्ष लागणार - गोविंदगिरी महाराज
  3. राम मंदिर भूमीपूजनासाठी शिर्डीतून साई तीर्थ, विभूती अन् मंदिरातील माती आयोध्येला रवाना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.