ETV Bharat / state

Ganeshotsav २०२३  : मराठा बटालियन यंदा उत्साहात करणार गणेशोत्सव साजरा; 'श्रीं'च्या प्रतिकात्मक मूर्ती पुण्यातून रवाना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 8:57 PM IST

Updated : Sep 13, 2023, 9:30 PM IST

Ganeshotsav 2023 : यंदाच्या गणेशोत्सवात भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत. लष्करातील मराठा बटालियनच्या 5 तुकड्यांसाठी 'श्रीं'च्या प्रतिकात्मक मूर्ती पुण्यातून रवाना झाल्या आहेत. त्यामुळं मराठा बटालियनदेखील आता उत्साहात गणेशोत्सव साजरा करणार आहे.

Ganeshotsav 2023
गणेशोत्सव 2023

मराठा बटालियनसाठी 'श्रीं'च्या प्रतिकात्मक मूर्ती पुण्यातून रवाना

पुणे Ganeshotsav 2023 : बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असतात, त्यामुळं त्यांना पुण्यामध्ये येताच येतं, असं नाही. त्यामुळे यंदा भारतीय लष्करातील 33, 19, 1, 5 आणि 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसह भारताच्या विविध सीमावर्ती भागात दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केलीय. ट्रस्टनं सैनिकांच्या इच्छेला मान देऊन 'श्रीं'ची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचं मान्य केलं. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. (Dagdusheth ganapati symbolic idol)

Ganeshotsav 2023
गणेशोत्सव 2023


13 वर्षे हा उपक्रम सुरु : यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हे उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळ मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांनी व्यक्त केलीय. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणं ट्रस्टकडे विनंती करणारं पत्र पाठविलं होतं. सलग 13 वर्षे हा उपक्रम सुरू असून बटालियनच्या संख्येतदेखील वाढ होतेय. (Ganesha left for Pune for Maratha battalion)

Ganeshotsav 2023
गणेशोत्सव 2023


गणेशोत्सव मोठ्या उत्साहात : ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करते. त्यामुळं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जातेय. यंदा ट्रस्टतर्फे 6 मूर्ती सैन्यदलातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत. (Dagdusheth ganapati idol for Maratha battalion)


मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा : सन 2011 पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्यानं मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळं बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील मराठा बटालियनच्या सैनिकांनी व्यक्त केलीय. (Maratha battalion Ganeshotsav)

हेही वाचा :

  1. Ganesh Chaturthi 2023: गणरायाला सोन्याचा साज चढवण्यासाठी सजली बाजारपेठ, सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांना वाढली मागणी
  2. Ganeshotsav 2023: भाविकांची काळजी म्हणून 'या' गणेश मंडळांनी उतरवलाय विमा
  3. Ganeshotsav 2023: गणपती बाप्पा मोरया! पाहा, ढोल ताशांच्या गजरात वृंदावनच्या राजाचं ठाणे नगरीत जल्लोषात स्वागत
Last Updated :Sep 13, 2023, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.