ETV Bharat / state

गणेशोत्सव 2021: दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापणा कधी? वाचा सविस्तर...

author img

By

Published : Sep 9, 2021, 1:51 PM IST

गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापणा गणेश चतुर्थीला उद्या सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते होणार आहे. मंडळाचे नियोजन वाचा सविस्तर...

dagdusheth halwai ganpati
dagdusheth halwai ganpati

पुणे : गणेशोत्सवाला उद्यापासून (10 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापणा गणेश चतुर्थीला शुक्रवारी (10 सप्टेंबर) सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री व वेदमूर्ती मिलींद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा मंदिरामध्ये संपन्न होईल. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येणार आहे.

  • ॠषीपंचमीनिमित्त ऑनलाईन अथर्वशीर्ष पठण - यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नाही. त्यामुळे ट्रस्टने ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवारी (११ सप्टेंबर) पहाटे ६ वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाईन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम याद्वारे या उपक्रमाचा भाविकांना आनंद घेता येईल.
  • धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - १० ते १९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी महागणेश याग आणि दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत लक्षावर्तन, होम-हवन हे वेदमूर्ती नटराज शास्त्री करणार आहेत. तर, ब्रह्मणस्पती सुक्त पारीजात वेदमूर्ती धनंजय घाटे व ब्रह्मवृंद करणार आहे. १७ सप्टेंबरला ६ वेदमूर्ती मधुकर जांभेकर गुरुजी मंत्रजागर करणार आहेत. उत्सवकाळात श्रींची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभवता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.
  • श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यूट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसादही दिला जाणार नाही. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - यंदाही गणेशोत्सवाला ढोलताशाचा गजर नाहीच, कोरोना प्रतिबंधंक निर्बंधामुळे वाद्य प्रेमींच्या आनंदावर विरजण

हेही वाचा - यंदा लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा मूग डाळीचे मोदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.