ETV Bharat / state

Pune Fire : फटाके फोडताना घ्या काळजी! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात 23 ठिकाणी आगीच्या घटना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 8:34 AM IST

Updated : Nov 13, 2023, 9:07 AM IST

Pune Fire : लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुण्यात तब्बल 23 ठिकाणी आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Fire incident cases during diwali in maharashtra pune
लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुण्यात 23 ठिकाणी आग

लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुण्यात 23 ठिकाणी आग

पुणे Pune Fire : दिवाळी सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बहुतेक लोक दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडून हा सण साजरा करतात. त्यातच लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून फटाके फोडू नये, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तरी अनेक नागरिकांकडून निष्काळजीपणानं फटाके फोडण्यात येतात. दिवाळीच्या या धामधूमीत अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरातील बहुतेक ठिकाणी लागलेल्या आगीमुळं घर व दुकानांच अतोनात नुकसान झालंय.

पुण्यातही अनेक ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी (12 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांनी शहरात तब्बल 23 ठिकाणी आगीच्या घटना घडल्यात. सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, यापुढं फटाके फोडतांना काळजी घेणं फार गरजेचं आहे.


कोणकोणत्या ठिकाणी व रात्री घडल्या आगीच्या घटना :

  1. 7:38 - रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग
  2. 7:40 - कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग
  3. 8:18 - वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग
  4. 8:24 - कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचरयाला आग
  5. 8:50 - नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग
  6. 8:52 - घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग
  7. 8:57 - कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग
  8. 8:58 - वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग
  9. 9:00 - शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग
  10. 9:13 - केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग
  11. 9:27 - आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग
  12. 9:31 - शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसरया मजल्यावर आग
  13. 9:32 - गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग
  14. 9:50 - हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग
  15. 9:51 - पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज १ येथे घराच्या गॅलरीमध्ये आग
  16. 10:08 - रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग
  17. 10:09 - लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत गॅलरीमध्ये आग
  18. 10:23 - विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ इमारतीत गॅलरीत आग
  19. 10:28 - वडारवाडी, पांडव नगर येथे घरामध्ये आग
  20. 10:34 - धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग
  21. 10:43 - गुरुवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ घरामध्ये आग
  22. 10:52 - बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग
  23. कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला आग

दरम्यान, अग्निशमन दल नियंत्रण कक्षात रात्री 07:38 ते राञी 12:00 वाजेपर्यंत फटाक्यामुळे आगीच्या 23 घटनांची नोंद आहे. आतापर्यंत कुठल्याही जखमी वा जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा -

  1. Mumbai Fire News : मुंबईतील न्यू पूनमबाग इमारतीला भीषण आग; आगीत होरपळून 96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  2. Mumbai Fire : दादरमधील कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये आग; 17 ते 18 गाड्या जळून खाक
  3. Mumbai Building Fire : कांदिवलीमधील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आग; दोघांचा मृत्यू
Last Updated : Nov 13, 2023, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.