ETV Bharat / state

Border Dispute : सीमा प्रश्नावर शिवसेना आक्रमक, आंदोलक शिवसैनिकांना घेण्यात आलं ताब्यात...स्वारगेट बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त

author img

By

Published : Dec 6, 2022, 4:56 PM IST

Updated : Dec 6, 2022, 5:49 PM IST

कर्नाटक आणि महाराष्ट्र वाद चांगलाच पेटला (dispute between Karnataka and Maharashtra) आहे. त्यातच आज कन्नड वेदिका रक्षिता संघटने कडून सीमा भागामध्ये महाराष्ट्राच्या सहा ट्रक्स वर दगडफेक करण्यात आल्याने, वादाची ठिणगी आणखी पेटली. त्यामुळे पुणे येथे शिवसैनिक (Shiv Sena aggressive on border issue) आक्रमक झाले असतांना, त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. तर स्वारगेट बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त (Shiv Sainiks arrested by police) ठेवण्यात आला आहे.

Shiv Sena Aggressive
सीमा प्रश्नावर शिवसेना आक्रमक

पुणे : कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील गावे सामील करून घेण्याचा निर्णयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने वक्तव्य करीत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना कर्नाटकात मध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आल्यानंतर सीमा प्रश्न चांगलाच तापलेला (dispute between Karnataka and Maharashtra) आहे. आज कन्नड वेदिका रक्षिता संघटने कडून सीमा भागामध्ये महाराष्ट्राच्या सहा ट्रक्स वर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले. दरम्यान पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांवर काळे फासून निषेध व्यक्त (Shiv Sena aggressive on border issue) करित असतांनी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी, पोलीसांनी ताब्यात (Shiv Sainiks arrested by police) घेतलं आहे. तर स्वारगेट बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देतांना शिवसैनिक व डिसीपी



सीमा प्रश्र्नी दोन्हीकडून इशारा देण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने सहा डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनामुळे कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून दोन्ही मंत्र्यांनी सीमा प्रश्नावरच्या आपला दौरा रद्द केला होता. त्यानंतर कन्नड वेदिका रक्षिता संघटने कडून सीमा भागामध्ये महाराष्ट्राच्या सहा ट्रक्स वर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आता पुण्यात सुद्धा शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसवर काळे फासले. या प्रकरणी आत्ता पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतला असून; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सीमा प्रश्नाचे प्रकरण हे न्यायालयात असताना आणि त्या ठिकाणाहून न्यायालयीन लढाई दोन्ही राज्याकडून लढत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने त्या भागात न येण्याचा इशारा देत आहेत. त्याचबरोबर सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा केली आहे. परंतु महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात विरोधकाकडून शिंदे सरकार यांना सीमा प्रश्नावर सातत्याने टार्गेट केलं जात आहे. त्यातच आता शिवसेनेने पुण्यात हे आंदोलन केले आहे. विरोधकांनी राज्यामध्ये शिंदे फडवणीस सरकारला धारेवर धरला असून, या सरकार मध्ये सीमा प्रश्नावर लढण्यासाठी हिंमत नाही. हिंमत नसेल तर खुर्च्या सोडा सरकार चालवतो आणि सीमा प्रश्नही सोडवतो असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी काल दिलं होतं. आता या प्रकरणी आज पुण्यात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत, कर्नाटक राज्याच्या गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहीत, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

तर, आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कर्नाटक तसेच विविध राज्याच्या बसची ये-जा सुरु असते. तेव्हा जोपर्यंत वाद सुरू आहे. तोपर्यंत प्रत्येक बस स्थानकाच्या बाहेर आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत, अशी माहिती यावेळी डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली.

Last Updated : Dec 6, 2022, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.