ETV Bharat / state

Students Resolve For New Year 2023 : दगडूशेठ गणपतीच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प

author img

By

Published : Dec 31, 2022, 9:11 PM IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजिक गणपती ट्रस्ट ( Dagdusheth Ganapati Witness Made Students ) यांच्या पुढाकाराने "निर्धार व्यसनमुक्तीचा ( Determination of Addiction ), संकल्प नवीन वर्षाचा" डिजिटल व्यसनमुक्ती उपक्रम घेण्यात आला. डिजिटल व्यसनमुक्तीचा ( New Year 2023 ) संकल्प नववर्षाचा, दगडूशेठ गणपती बाप्पाचा आशीर्वाद हाच आम्हाला आधार, असा संकल्प करीत विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पासमोर शपथ घेतली.

Dagdusheth Ganapati Witness Made Students Resolve to Get Rid of Digital Addiction; 'Determination of Addiction, Resolution of New Year
दगडूशेठ गणपतीच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प

पुणे : पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर विद्यार्थ्यांनी आगळा-वेगळा संकल्प ( Dagdusheth Ganapati Witness Made Students ) केला. विद्यार्थ्यांनी गणपतीसमोर शपथ घेऊन डिजिटल व्यसनमुक्तीचा ( Determination of Addiction ) अनोखा संकल्प केला. 'डिजिटल व्यसनमुक्तीचा नववर्षी निर्धार', 'दगडूशेठ गणपती बाप्पाचा आशीर्वाद हाच ( Determination of Addiction Resolution of New Year ) आम्हाला आधार', 'रात्रीचा करिती दिवस कारणे फेसबुक', 'इन्स्टा, व्हाॅट्सअॅप, नेटफ्लिक्स मग दिवसभराचा आळस, करशील कधी रे अभ्यास', असे डिजिटल व्यसनमुक्तीचे गांभीर्य ( New Year 2023 ) सांगत निर्धार व्यसनमुक्तीचा निर्धार करून बलदंड भारताची निर्मिती करण्यात माझे योगदान देईन, असा संकल्प दगडूशेठ बाप्पांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला.

दगडूशेठ गणपतीच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी केला डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प

दगडूशेठ गणपती ट्रस्ट यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचा संकल्प श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजिक गणपती ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आणि टाकळकर क्लासेस यांच्या सहकार्याने "निर्धार व्यसनमुक्तीचा, संकल्प नवीन वर्षाचा" हा डिजिटल व्यसनमुक्ती उपक्रम विद्यार्थ्यांसोबत राबविण्यात आला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, टाकळकर क्लासेसचे प्रा. केदार टाकळकर, शितल पाटील उपस्थित होते. यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराच्या येथे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी जमले होते. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून डिजिटल व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी केला डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प या उपक्रमाची सुरुवात अथर्वशीर्ष पठणाने झाली. 'निर्धार व्यसनमुक्तीचा, संकल्प नववर्षाचा' 'आशीर्वाद त्याला दगडूशेठ गणपती बाप्पाचा', अशी प्रतिज्ञा विद्यार्थांनी यावेळी केली. वर्षांच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प करून सकारात्मक मार्ग दाखवून दिला आहे. नवीन कार्य करण्याची प्रेरणा गणपती बाप्पाने विद्यार्थ्याना दिली आहे. डिजिटल व्यसनमुक्तीच्या मार्गाचे अनुकरण केले, तर नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा हा उपक्रम आहे.

महेश सूर्यवंशी यांनी केले मार्गदर्शन महेश सूर्यवंशी म्हणाले, वर्षांच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यसनमुक्तीचा संकल्प करुन सकारात्मक मार्ग दाखवून दिला आहे. नवीन कार्य करण्याची प्रेरणा गणपती बाप्पांनी विद्यार्थ्याना दिली आहे. डिजिटल व्यसनमुक्तीच्या मार्गाचे अनुकरण केले तर नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल असा हा उपक्रम आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, टाकळकर क्लासेसचे प्रा. केदार टाकळकर, शितल पाटील उपस्थित होते. यावेळी दगडूशेठ गणपती मंदिराच्या येथे शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी जमले होते. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून डिजिटल व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.