ETV Bharat / state

जनतेनी हरवल्यावर खोटारड्या लोकांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भाजपवर टीका

author img

By

Published : Nov 8, 2021, 8:27 PM IST

Updated : Nov 8, 2021, 9:56 PM IST

केंद्राने आज जी 60 टक्के वाढ करून लोकांचे खिसे कापण्याचा प्रकार सुरू केला आहे, याचा जाब काँग्रेसच्या वतीने विचारला जाणार आहे. ही महागाई एवढी का वाढवली याचे उत्तर केंद्रातील लोकांना द्यावं लागणार आहे. भाजप हे खोटारडे असून लोकांची दिशाभूल करून खिशे कापण्याचे काम हे सरकार करत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.

nana patole
नाना पटोले

पुणे - सातत्याने केंद्र सरकारने महागाई वाढवली आहे. हे सातत्याने काँग्रेस पक्ष सांगत आहे. आम्ही कितीही पाप केले तर लोक आम्हाला निवडून देतील असे भाजपला अमरपट्टा लावल्यासारख वाटत होतं. मात्र, ज्या पद्धतीने पोटनिवडणूका झाल्या त्यानंतर त्यांना कळाले की भारताची लोकशाही ही किती मजबूत आहे. त्यांना कळल्यानंतरच त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या. हे सगळं काँग्रेसने करुन ठेवले आणि आम्हाला भाव कमी करता येत नाही, असे ही भाजपचे लोक सांगत होते. मात्र, या खोटारड्या लोकांना आज जनतेने पटकल्यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करत आहे, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तसेच त्यानंतरही भाजप उलट बोंबाबोंब करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात सरकार येऊन 2 वर्ष पूर्ण झाली आहे. सरकारने सुरुवातीला फक्त 1 रुपया दर वाढवला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे दर वाढवलेला आहे तोच दर आज ही आहे. तेव्हा त्यांनी जे काही टॅक्स वाढवले होते ते बरोबर होते का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला केला.

माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजप हे खोटारडे -

केंद्राने आज जी 60 टक्के वाढ करून लोकांचे खिसे कापण्याचा प्रकार सुरू केला आहे, याचा जाब काँग्रेसच्या वतीने विचारला जाणार आहे. ही महागाई एवढी का वाढवली याचे उत्तर केंद्रातील लोकांना द्यावं लागणार आहे. भाजप हे खोटारडे असून लोकांची दिशाभूल करून खिशे कापण्याचे काम हे सरकार करत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.

त्यांच्याबद्दल मी काय बोलावे -

चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते निवडणुकीत मत मागत असताना गाव-जेवणही द्यायाला तयार असतात. त्यांच्याबद्दल मी काय बोलावं? असा टोला देखील यावेळी नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

हेही वाचा - राज्याचे माजी गृहमंत्री वसुली प्रकरणात कारागृहात बंद असणे हे अतिशय लाजिरवाणे - देवेंद्र फडणवीस

सोमय्यांच्या एकही आरोपांचं काय झालं -

किरीट सोमैयांनी आत्तापर्यंत जे काही आरोप केला आहे त्या आरोपांचा काय झाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या धोरणामुळे जे काही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्या विषयांवरून लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. भुजबळांचे उदाहरण आज लोकांसमोर आहे. हे लोक आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा काम करत आहे, अशी टीकाही नाना पटोलेंनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू -

राज्यात जेवढे काही महामंडळ आहे तेथील कामगारांना शासन सेवेत घेतले गेले आहे. एसटी महामंडळाच्या कामगारांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायावर काही विषयांवर निश्चित मार्ग निघायला पाहिज होता. प्रवाशांचे हाल झाले नसते. एसटी कर्मचाऱ्यांच्या लोकांनी ही यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी केली. आज राज्याच्या मुख्य सचिवांकडून एक समिती तयार करून या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. जेव्हा यांच्या संघटनेबरोबर बैठक झाली होती तेव्हा काही मागण्या मान्य केल्या होत्या. राज्यात मागून भडकवायचे जे काही राजकारण सुरू झालं आहे, ते व्हायला नको होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Last Updated : Nov 8, 2021, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.