ETV Bharat / state

City Manager beaten : पुण्यात खंडणीसाठी श्रीराम फायनान्सच्या सिटी मॅनेजरचे अपहरण करून जबर मारहाण, दोघांना अटक

author img

By

Published : Jun 10, 2023, 10:16 PM IST

श्रीराम फायनान्सच्या मॅनेजरला खंडणीसाठी अपहरण करून मारहाण करण्यात आले आहे. दोन व्यक्तींकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातल्या हॉटेलमध्ये आणि फ्लॅटमध्ये नेऊन ही मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आरोपी
आरोपी

पुणे - पुण्यामध्ये नामांकित श्रीराम फायनान्सच्या मॅनेजरला खंडणीसाठी अपहरण करून मारहाण करण्यात आले आहे. दोन व्यक्तींकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातल्या हॉटेलमध्ये आणि फ्लॅटमध्ये नेऊन ही मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की श्रीराम फायनान्सचे पुणे शहर मॅनेजर राकेश सुभाष पाटील राहणार कोथरूड यांच्या इन्शुरन्स कमिशन वरून ईशान अरुण कदम राहणार वारजे यांचा अंतर्गत होत होता. परंतु याच वादातून खंडणी मागण्यासाठी अरुण कदम याने त्याचा मित्र सौरव सुनील गोरे यांच्यासोबत फायनान्स मॅनेजर राकेश सुभाष पाटील यांच्या घरी येऊन दांडक्याने मारहाण करून महिंद्रा थार गाडीमध्ये जबरदस्ती बसवून अपहरण करून घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या घरच्यांकडे आणि मित्राकडे पाच लाख रुपयाची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर राकेश पाटील यांना मारून टाकीन अशी धमकी देण्यात आली होती. याबाबत अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पाच लाखाच्या या खंडणी प्रकरणी हे दोन्ही आरोपी नाव ईशान अरविंद कदम व 31 वर्ष रोजरी स्कूल जवळ वारजे आणि सौरव सुनील गोरे वय 30 वर्ष राहणार फ्लॅट ४०१ पुणे या आरोपीच्या तपास करण्यात आले. हे आरोपी शिवापुर भागात असल्याने तात्काळ पोलिसांनी शोध मोहीम हाती घेऊन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे.


संपूर्ण तपास करून या प्रकरणी आता या दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून गुन्ह्यांत वापरण्यात आलेली थार गाडी आणि रॅपिड स्कोडा ही गाडी जप्त केली आहे. माहितीच्या आधारे शोध घेण्यात येत असताना गुन्हेगाराने आपले लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री सूर्यकांत काळे, श्री गणेश चव्हाण, पोलीस अमलदर सिद्धाराम कोळी सोमेश्वर यादव असेच राठोड धीरज पवार नाशिक गायकवाड नितीन राऊत निंबाळकर योगेश झेंडे यांनी केली आहे. तपास पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.