भिडे वाड्याच्या जागेवर उभी राहणार शाळा; छगन भुजबळ यांची माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 4:00 PM IST

Chhagan Bhujbal On Bhide Wada

Chhagan Bhujbal On Bhide Wada : मंत्री छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर आहेत. आज महापालिकेच्या वतीनं समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्मारक भिडे वाड्याच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती 'सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा' वाटली पाहिजे, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी दिले.

माहिती देताना मंत्री छगन भुजबळ

पुणे Chhagan Bhujbal On Bhide Wada : मागच्याच आठवड्यात महापालिकेच्या वतीने सर्वाच्च न्यायालयाच्या निकालानंतर भिडे वाड्याची जुनी इमारत ही जमीनदोस्त करण्यात आली होती. आज महापालिकेच्या वतीनं समता परिषदेचे अध्यक्ष आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळ यांनी भिडे वाड्याच्या बाबतीत आपली भूमिका जाहीर करत त्याजागी शाळा बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच तिथं कुठेलेही दुकान हे बांधण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

शाळेला बाहेरून जुन्या पद्धतीचं रूप : यावेळी भुजबळ म्हणाले की, भिडे वाड्याची जमीन ही आता शासनाच्या ताब्यात आलीय. आज आमची यासंदर्भात बैठक झाली आणि तिथं सावित्रीबाई फुले यांची 'पहिली मुलींची शाळा' (First Girls School Bhidewada) होती, तशी शाळा त्या जागेवर बांधण्यात यावी यासाठी प्रस्ताव देण्यात आला. ते करत असताना शाळेच्या आतमध्ये आधुनिक सुविधा असाव्यात. पण बाहेरून जुन्या पद्धतीचं रूप त्या शाळेला देण्यात यावं. तसेच शाळेत सावित्रीबाई फुले यांचं स्मारक आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती देखील असावी.दुकान न टाकता फक्त शाळा बांधण्यात येणार : भिडे वाड्याच्या संदर्भात एक कमिटी तयार करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत ज्याचं काम चांगल असेल त्यांना ते देण्यात यावं. तसेच तिथं जे दुकानदार होते, त्यांच्याशी देखील वेळोवेळी चर्चा करण्यात आली होती. एक नव्हे, दोन नव्हे अनेक वेळा बैठका घेऊन त्यांना वेगवेगळे प्रस्ताव देखील देण्यात आले होते. असं असताना मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. पण आता न्यायालयीन लढाई लढून ती जागा शासनाने आपल्या ताब्यात घेतली आहे. आत तिथं कुठलीही दुकानं न टाकता फक्त शाळा बांधण्यात येणार असल्याचं यावेळी भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी मराठवाड्यात कमी, अधिकाऱ्यांचा हलगर्जी केल्याचा जरांगे पाटील यांचा आरोप
  2. 'गो बॅक' म्हणत छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र; कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर अखेर भुजबळांनी अर्धवट सोडला दौरा
  3. 'जो महापुरूषांची जात काढतो त्याच्याबद्ल बोलायचं नाही', जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.