ETV Bharat / state

एकदा कोरोना संपू द्या मग बघा प्रक्षोभ कसा उसळतोय - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Jun 9, 2021, 7:52 PM IST

Updated : Jun 9, 2021, 8:41 PM IST

पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भेट मराठा आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे - कोरोनाची बंधने आहे म्हणून लोक शांत आहे. तरी आपापल्या परीने आंदोलन करत आहे. कोरोनाची बंधने तुम्ही संपवा मग बघा लोक आपला प्रक्षोभ कसा दाखवतात, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. भाजपने तर अगोदरच जाहीर केली की भाजप आंदोलन करणार नाही आपल्या पक्षाचा झेंडा काढून फक्त आंदोलनात सहभागी होणार आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

बोलताना चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिएटीव्ह फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब तसेच वंचित घटकांना अन्यधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला दिशाभूल करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जो संवाद साधण्याचा प्रयत्न झाला त्याच स्वागत. महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रश्न घेऊन गेले त्याबाबत त्यांचे अभिनंदन

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल (दि. 8 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांच्याकडे प्रश्न मांडले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा समाजाची दिशाभून करण्याचा प्रयत्न केला आहे. 102 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्याला जात मागास ठरवण्याचा अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याबाबत केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे.

वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती

वाघासोबत दोस्ती व्हावी यासाठी पुण्यातील एका पदाधिकाऱ्याने मला प्रतिकात्मक वाघ भेट दिले आहे. पण, वाघाची आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धव ठाकरे यांची मोदींशी जुनी दोस्ती आहे. पण, देवेंद्र फडणवीस आणि माझ्याशी त्यांचे जमत नाही. का जमत नाही त्यांना विचारा. चांगली मैत्री असती तर सरकार आली असती, असे यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा - पुणे जिल्हा रुग्णालयातील ओपीडी अविरतपणे सुरू

Last Updated : Jun 9, 2021, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.