ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील यांनी गायलं कोळी गीत...पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Oct 23, 2019, 10:14 PM IST

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना,आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोळी गीत गायलं.

चंद्रकांत पाटील यांनी गायलं कोळी गीत

पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना,आरपीआय महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कोळी गीत गायलं आहे. पुण्यात दिवाळी निमित्त आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी गीत गायले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर निवडणुकांचे काय निकाल लागणार याची चिंता पाहायला मिळाली नाही.या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि इतर राजकीय मंडळींना हलके फुलके प्रश्न विचारण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी टीमक्याची चोळी बाई रंगा फुलांची या गाण्याच्या ओळी गायल्या आहेत.

चंद्रकांत पाटील कोळी गीत गाताना..


चंद्रकांत पाटील याआधी पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जात होते. परंतु, यंदा भाजपने थेट प्रदेशाध्यक्षांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने कोथरूड मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत झाली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात मनसेने कोथरूडमध्ये दोनदा नगरसेवक राहिलेले किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील स्वत:च्या पक्षातून उमेदवार देणे टाळले व किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यामुळे कोथरूडकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले.


सध्या कोथरूडमध्ये भाजप विरोधकांची एकजूट झाली असली, तरीही कोथरूडमधील संघाच्या विचारसरणीला मानणारे लोक तसेच ब्राम्हण समुदायाचा प्रभाव असल्याने चंद्रकांत पाटील यांना आयती मदत होऊ शकते. तसेच किशोर शिंदेंसाठी विरोधकांनी एकवटलेली ताकद, स्वत:चा जनसंपर्क व दोन वेळा नगरसेवक असताना केलेली कामे ही जमेची बाजू आहे.

Intro:चंद्रकांत पाटील यांनी गायलं कोळी गीतBody:mh_pun_03_cjandrakant_patil_song_av_7201348

Anchor
मला कोळी गीत आवडतात आणि मी गातो ही असे म्हणत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोळी गीत गायलं....निमित्त होत पुण्यात दिवाळी निमित्त आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुरुवारी काय निकाल लागणार याची चिंता चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर नव्हती सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि उमेदवार उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि इतर राजकीय मंडळींना हलके फुलके प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी टीमक्याची चोळी बाई रंगा फुलांची या गाण्याच्या ओळी गायल्याConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.