ETV Bharat / state

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय

author img

By

Published : Oct 9, 2019, 11:12 PM IST

Updated : Oct 9, 2019, 11:27 PM IST

पुण्यामध्ये कलम ३७० आणि ३५ अ या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील

पुणे - जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. आम्ही आमच्या ३० मिनिटांच्या भाषणात पाच मिनिट बोललो तर त्यात गैर काय, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पुण्यामध्ये कलम ३७० आणि ३५ अ या विषयावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल उपस्थित होते.

pune
व्यासपीठावर लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. या विषयासाठी जनसंघाचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 'एक देश मे दोन निशान, दो संविधान नही चलेगा' चा नारा देत बलिदान दिले. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी आंदोलने केली. यासाठी तुरुंगवास भोगला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली झाले होते. पण यावेळी आम्हाला अटक झाली होती. यानंतर आम्ही तत्कालिन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची भेट घेऊन तिरंगा झेंडा भेट दिला आणि तुम्ही तरी हा झेंडा श्रीनगरच्या लाल चौकात फडकवा, अशी विनंती केली होती. आता हाच विषय देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सोडवला आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात त्याचा आनंद साजरा करणे, यात गैर काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - ठरलं! राहुल गांधी 'या' तारखेला राज्यात प्रचाराला येणार

लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम आणि ३५ अ हटवल्यानंतर अनेकांना मानवतावादाचे उमारे फुटले आहेत. मुंबई-दिल्लीतील अनेक तथाकथित बुद्धिवजीवी सरकार कशाप्रकारे येथील जनतेची मुस्कटदाबी करत आहे, यावर मगराश्रू ढाळत आहेत. पण ३७० आणि ३५ अ मुळे येथील जनता जेव्हा नरक यातना सहन करत होती, त्यावेळी हे बुद्धिजीवी गप्प का होते? त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या यातना दिसल्या नाहीत का?" असा सवाल उपस्थित करुन काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काश्मीर संदर्भातील बोटचेप्या धोरणावर टीका केली.

हेही वाचा - 'राफेल' पुढे ठेवलेल्या लिंबू वरून ओवीसींनी परभणीत उडवली भाजप-सेनेची टर

Intro:जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय , चंद्रकांत पाटीलBody:mh_pun_03_kalam_370_charchasatra_av_7201348

anchor
जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय असून, आम्ही आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात पाच मिनिट बोललो तर त्याच गैर काय असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पुण्यामध्ये कलम ३७० आणि ३५ ए या विषयावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्यालउपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. या विषयासाठी जनसंघाचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 'एक देश मै दोन निशान, दो संविधान नही चलेगा'चा नारा देत बलिदान दिले. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झेंडा फडकवण़यासाठी आंदोलनं केली. यासाठी तुरुंगवास भोगला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली झाले होते. पण यावेळी आम्हाला अटक झाली होती. यानंतर आम्ही तत्कालिन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची भेट घेऊन तिरंगा झेंडा भेट दिला, आणि तुम्ही तरी हा झेंडा श्रीनगरच्या लाल चौकात फडकवा, अशी विनंती केली होती. आता हाच विषय देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सोडवला आमच्या ३० मिनिटाच्या भाषणात त्याचा आनंद साजरा करणं, यात गैर काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लडाखचे खासदार जमयांग सेटिंग नामग्याल यांनी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम आणि ३५ ए हटवल्यानंतर अनेकांना मानवतावादाचे उमारे फुटले आहेत. मुंबई-दिल़लीतील अनेक तथाकथित बुद्धिवजीवी सरकार कशाप्रकारे इथल्या जनतेची मुस्कटदाबी करत आहे, यावर मगराश्रू ढाळत आहेत. पण ३७० आणि ३५ ए मुळे इथली जनता जेव्हा नरकयातना सहन करत होती, त्यावेळी हे बुद्धिजीवी गप्प का होते? त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या यातना दिसल्या नाहीत का?" असा सवाल उपस्थित करुन काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काश्मीर संदर्भातील बोटचेप़या धोरणावर टीका केली.
Conclusion:
Last Updated : Oct 9, 2019, 11:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.