ETV Bharat / state

दौंड : शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ भाजपचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

author img

By

Published : Mar 2, 2022, 3:42 PM IST

Updated : Mar 2, 2022, 5:31 PM IST

bjp protest
भाजपचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील दापोडी येथील महावितरण कार्यालयावर भाजपने मोर्चा काढला. यावेळी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करत आहे, अशी टीका यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली आहे.

दौंड(पुणे) - शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील दापोडी येथील महावितरण कार्यालयावर भाजपने मोर्चा काढला. यावेळी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करत आहे. राज्यात सरकार आहे का नाही अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. दौंड तालुक्यात नदीला, बोरला, विहीरीला पाणी आहे. मात्र, वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचे वीजबिल त्वरित माफ करून वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली आहे.

वासुदेव काळे - प्रदेश अध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा

महावितरणकडून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने दौंड तालुक्यातील दापोडी येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वासुदेव काळे हे बोलत होते.

पुढे बोलताना काळे म्हणाले की, महावितरणकडून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे, त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आज वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर काढण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विजबिलाबाबत चुकीचे धोरण राबवित आहे. चुकीची बिले वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलेली आहेत. चुकीच्या वीज बिलांमुळे वीज बिल भरायला तयार असणारा शेतकरी मागे सरत आहे. आमची मूलभूत मागणी अशी की या सरकारने डिसेंबर 2021 पर्यंतची संपूर्ण वीज बिल माफी करावी. 1 जानेवारी 2022 पासून शेतकऱ्यांना नव्याने वीजबिल आकारावे.

मुख्यमंत्र्यांवर कांचन कुल यांची टीका

पुणे जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन कुल यावेळी म्हणाल्या की, आता काढण्यात आलेला मोर्चा हा दौंड तालुक्याचा मोर्चा आहे . परंतु हा संपूर्ण राज्याचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्यायला संवेदनशील काळजी लागते, परंतु राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल की राज्याला असे मुख्यमंत्री मिळालेत की ते आपल्या बंगल्यातून बाहेर यायला तयार नाहीत.

पुढे त्या म्हणाल्या की, भाजपाचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत होते. भाजपाचे सरकार असताना एकाही शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला नव्हता.

आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात -

या मोर्चावेळी भाजपा पुणे जिल्हा महिला अध्यक्ष कांचन कुल, तानाजी दिवेकर, भाजपा तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बापू भागवत यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनावेळी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Last Updated :Mar 2, 2022, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.