ETV Bharat / state

Architectural Consultant Murdered : सोन्याच्या मोहापोटी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मित्राकडून खून; मृतदेह नदीत फेकला

author img

By

Published : Nov 1, 2022, 10:57 PM IST

वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण (Kidnapping and murder of architectural consultant) करून दागिन्यांच्या मोहापोटी त्याच्याच मित्राने खून (killing a friend for gold) केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात घडली आहे. आरोपीने खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकल्याचे (killing and throwing the body in the Neera river) तपासात निष्पन्न झाले आहे. Pune Crime, Latest News from Pune

Architectural Consultant Murdered
वास्तुशास्त्र सल्लागाराचा मित्राकडून खून

पुणे: वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण (Kidnapping and murder of architectural consultant) करून दागिन्यांच्या मोहापोटी त्याच्याच मित्राने खून (killing a friend for gold) केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात घडली आहे. आरोपीने खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकल्याचे (killing and throwing the body in the Neera river) तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने नीरा नदीत मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र अद्याप मृतदेह शोधण्यात यश आलेले नाही. Pune Crime, Latest News from Pune

पूजा करण्याच्या बहाण्याने नेले अन् जीवे मारले- निलेश वरघडे असं वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव असून तर आरोपी दिपक नरळे आणि त्याचा साथीदार रणजित जगदाळे ह्या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निलेश वरघडे हे वास्तुशास्त्र सल्लागार होते. 16 ऑक्टोबरला मित्र दिपक नरळे याने निलेश यांना पुण्यातील नऱ्हे येथे एका औषध दुकानात पूजेसाठी नेले होते. मात्र निलेश यांच्या अंगावरील दागिने पहिल्यानंतर दिपकने त्यांना लुटण्याचा डाव रचला. त्यासाठी आरोपी दिपक आणि त्याचा साथीदार रणजित यांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. ते बेशुद्ध पडल्यानंतर गळा दाबून त्यांचा खून केला.

आरोपीकडून खून केल्याची कबूली- त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गावरच्या नीरा नदीत टाकून दिला. दरम्यान निलेश हे घरी परत न आल्याने रुपाली रुपेश वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार केली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत आरोपी दिपक याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.


मृतदेह हाती लागेना- दरम्यान आरोपींनी खूनाची कबुली दिल्यानंतर गेल्या 9 दिवसांपासून निलेशच्या मृतदेहाचा शोध स्थानिक रेस्क्यू टीममार्फत नीरा नदीत घेण्यात येतो आहे. अद्याप मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलेले नाही. पोलिसांनी आरोपींकडून मोटार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 19 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.