ETV Bharat / state

Ajit Pawar On Tuljapur Dress Code: कोणत्या देवाने सांगितले की मुलं अर्ध्या चड्डीत आल्यावर त्यांना दर्शन घेऊ देऊ नका- अजित पवार

author img

By

Published : May 19, 2023, 6:31 PM IST

Ajit Pawar On Tuljapur Dress Code
अजित पवारांचे तुळजापूर मंदिर ड्रेसकोडबाबत मत

राज्यातील काही मंदिरांमध्ये कुठले कपडे घालून मंदिरात यावे, अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही शालेय जीवनात असताना दहावीपर्यंत आम्हाला हाफ पॅन्टवर जावे लागले. लहान मुलांनी हाफ पॅन्ट घातली म्हणून मंदिरात प्रवेश नाही, ही कुठली पद्धत काढली आहे. कोणत्या देवाने सांगितले की, मुले अर्ध्या चड्डीत आल्यावर त्यांना दर्शन घेऊ देऊ नका.

अजित पवारांचे तुळजापूर मंदिर ड्रेसकोडबाबत मत

पुणे: काही जण या गोष्टींचा बाऊ करत आहेत. तुळजापूर येथे जे काही घडले ते आक्षेपार्ह आहे. यात तातडीने सरकारने लक्ष दिले पाहिजे. तसेच तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी देखील लक्ष घातले पाहिजे. अशी बंधने आणू नये की, ज्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होतील, असे अजित पवार म्हणाले.


बजरंगबलीचा मुद्दा कुचकामी ठरला: पवार म्हणाले की, कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर आपण बघितले की बजरंगबली यांना डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी भाजपकडून प्रचार करण्यात आला. सभेला जात असताना तिथे जाणीवपूर्वक बजरंग बलीची मूर्ती देण्यात आली. पंतप्रधानांनी देखील आवाहन केले होते की, बजरंग बलीला डोळ्यासमोर ठेवून बटण दाबा; पण तसे काहीही झाले नाही.

तर जनता सहन करणार नाही: आपला महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. मधल्या काळात त्र्यंबकेश्वर, शेवगांव तसेच अकोल्याला जे घडल आहे ते घडता कामा नये. यात राज्य सरकारची महत्त्वाची जबाबदारी आहे. कोणीही भावनिक मुद्दा पुढे करून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर या राज्यातील जनता ते कदापि सहन करणार नाही. त्र्यंबकेश्वर येथे काही संघटना पुढे आल्या आणि त्यांनी गोमूत्र शिडकले. कोणी काय करावे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या राज्यात सर्वच जाती-धर्मातील लोक हे गुण्या गोविंदाने राहत आहेत. आपण पण अजमेर येथे चादर चढविण्यासाठी जात असतो. आपल्याला प्रत्येकाबाबत आदर आहे. त्र्यंबकेश्वर बाबत स्थानिकांनी सांगितले की, तिथे ही परंपरा 100 वर्षांपूर्वीची आहे. आता अशा गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत. सोशल मीडियाचा वापर करून समाजात तेढ निर्माण केले जात आहे. याचे जे कोणी मास्टरमाईंड असेल त्याने हे सर्व थांबविले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.



तर विकास कामे कशी होणार? पुणे जिल्ह्यात जवळपास 21 जागा या विधानसभेच्या आहेत. त्यातील 13 जागा या विरोधी पक्षाकडे आहेत. 8 ते 9 आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. निधीचा वापर होत असताना काही स्वीकृत सदस्य घेण्यात आले आहेत. मागच्या वेळेस निधी वाटप करताना काही आमदारांवर अन्याय झाला होता. आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती केली की, असे चालणार नाही. आमदारांना कमी निधी मिळाला तर विकास कामे कशी होणार, यावर चर्चा झाली. तसेच अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत की, ज्यांना निधी मिळालेले नाहीत. यावर आज चर्चा झाल्याचे अजित पवारांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट
  2. Nagpur Metro Project: नागपूर मेट्रो प्रकल्पात ८७७ कोटींचा भ्रष्ट्राचार; महामेट्रोचे माजी एमडी आणि लेखापालावर कारवाई करा- प्रशांत पवार
  3. Kiren Rijiju : किरेन रिजिजू यांनी भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारला, म्हणाले - 'हा बदल म्हणजे..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.