Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट

author img

By

Published : May 19, 2023, 4:21 PM IST

Thackeray

भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटूंबार गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे कुंटूंबाकडे एव्हढे पैसे येतात कुठून आसा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 'तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावरही खंडणीचा आरोप होता. उद्धव ठाकरेंनी आयुष्यात हेच केले. उद्धव, ठाकरे आणि त्यांचे कुटुंबाच्या उत्पन्नाचा एक रुपयाही नसतानाही ऐषोरामी जीवन कसे जगत आहेत असा सवाल' आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : ठाकरे कुटुंबाचे एक रुपयाचे उत्पन्न नसताना त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? असा घणाघात भाजप आमदार, नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे कुटुंबाला सर्व गोष्टी पुरवल्या जात आहेत. परंतु त्यांचे स्वतःचे काहीच उत्पन्न नाही. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली गाडी सुद्धा विदर्भातील एका आमदाराच्या नावावर आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे. ते मुंबईतील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे कुटुंबाकडे पैसा येतो कुठून? : ठाकरे यांच्या घरी एक तरी गोष्ट स्वतःच्या खर्चाने होत आहे का? त्यांच्या घरी एसी कुठल्या कंपनीचे आहेत. व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते? यांचे सर्व कपडे धुण्यासाठी लीला हॉटेलमध्ये जातात, कारण तेथे भारतीय कामगार सेनेची युनियन आहे. यांचे बाहेरचे परदेशी दौरे असतात त्यासाठी सुद्धा एक रुपया त्यांच्या खिशातून जात नाही. मोठ-मोठे उद्योगपती त्यांचा सर्व खर्च उचलतात. तिथून यांना परफ्युम पोहोचवले जातात. यापेक्षा जास्त माहिती किरण पावसकर देतील. घर स्वतःच नाही. गाड्या स्वतःच्या नाहीत. परफ्युम स्वतःचा नाही. मातोश्री २ साठी खर्च केला आहे, तो कुठून आणला? त्याचा सर्व तपशील नावा, बिलासहीत मी देऊ शकतो, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.

'महाविकास आघाडीची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात वसुली केली गेली. लोकांकडून खंडणी घेतली म्हणून त्यांच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कराव्या लागल्या. तत्कालीन मुख्यमंत्री, त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा खंडणीचे आरोप झाले. उद्धव ठाकरेंनी आपल्या आयुष्यात हेच केले आहे. स्वतःचे एका रुपयाचे उत्पन्न नसतानाही आलिशान आयुष्य उद्धवजी, त्यांचे कुटुंब जगत आहेत, ते कशामुळे आहे.' -आमदार नितेश राणे

आरोपांमध्ये तथ्य आहे : ठाकरे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला आहे. सुषमा अंधारे पक्षामध्ये दमदाटी करतात, सतत पैसे मागतात असेही त्यांनी म्हटले आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, कुठल्याही महिलेच्या मारहाणीचे आम्ही समर्थन करत नाही. आमच्यावर तसे संस्कार आहेत. कुठलीही महिला असेल, भगिनी असेल कोणीही तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये. सुषमाताईंनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी महिला म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. पण जिल्हाप्रमुखांनी जे काही आरोप केले आहे ते आरोप फार महत्त्वाचे आहेत.

सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप : उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पद विकायला काढले होते. त्या ऑफिसमधील सोफा, एसीसाठी पैसे मागत होत्या. हे सर्व व्हिडिओ तयार करून आरोप केले गेले आहेत. ते महाराष्ट्राने समजण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेव्हा उद्धव ठाकरे यांचे लोकं शिवसेनेची पदे विकत होते. आमदारकीचे पद विकतात, असे आरोप तेव्हाही केले होते. एकनाथ शिंदेंबरोबर जे आमदार आले त्यांनी सुद्धा हेच आरोप केले. संघटनेतील पद विकली जात आहेत. म्हणजे वारंवार असे आरोप होत असतील तर त्या आरोपांमध्ये तथ्य आहे. पण पक्षाच्या प्रमुखांमध्येच जे गुण आहेत ते कार्यकर्त्यांमध्ये येणारच, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

वाझेला सर्विसमध्ये का घेतलं? : सचिन वाझेला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना पुन्हा सर्विसमध्ये का घेतले? कारण त्याला त्यांच्या महिन्याच्या खर्चाचे टारगेट दिले होते. ठाकरे कुटुंबाचा महिन्याचा खर्च एवढा आहे, त्यामुळे एवढी ठरावीक रक्कम यायला हवी. त्यासाठी वर्षांमध्येसुद्धा तुमची राहायची व्यवस्था करतो. पण आमच्या महिन्याच्या खर्चाचे टार्गेट पूर्ण करा, असे उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेला सांगितल्याचा आरोपही नितेश राणेंनी केला आहे.

खंडणीच्या पैशावर जगणारी लोकं : नितेश राणे पुढे म्हणाले की, संजय राऊत विमानामध्ये फर्स्ट क्लासशिवाय फिरत नाहीत. यांच्याकडे बाहेरच्या गाड्या, इतकी प्रॉपर्टी आली कुठून? खंडणी घेऊनच हे सर्व जमा केले आहे. खंडणीच्या पैशावर जगणारी ही लोकं त्र्यंबकेश्वरमध्ये आंदोलन करणाऱ्या हिंदू बांधवांना दरोडेखोर, खंडणीखोर म्हणतात. संजय राऊतांचे धर्मांतर झालेले आहे. उगाच आमच्या हिंदू बांधवांना खंडणीखोर म्हणू नका. त्र्यंबकेश्वरविषयी हिंदुत्वाचे मोठे-मोठे स्वत: राऊतांनी केले आहेत. संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन पुन्हा परत येऊन दाखवावे. हुसेन दलवाई यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, असेही राणे म्हणाले.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics: अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्या कानशिलात लगावल्याची दिली कबुली; मातोश्रीवरुन पदावरून हकालपट्टीचे दिले आदेश
  2. Amrita Fadnavis Bribary News : अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल
  3. Karnataka CM : कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला ममता, नितीश, केसीआर यांना निमंत्रण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.