ETV Bharat / state

विराज खून प्रकरण: अजित पवारांनी घेतली जगताप कुटुंबाची भेट, चांगला वकील देण्याचे आश्वासन

author img

By

Published : Jun 14, 2020, 7:32 PM IST

Updated : Jun 14, 2020, 8:09 PM IST

विराज जगताप खून प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत विराजच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. चांगला वकील देण्याचे आश्वासन देखील यावेळी अजित पवार यांनी जगताप कुटुंबीयांना दिले.

pimpri chinchwad
विराज खून प्रकरण: अजित पवारांनी घेतली जगताप कुटुंबाची भेट

पुणे - विराज जगताप खूनप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत विराजच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. चांगला वकील देण्याचे आश्वासन देखील यावेळी अजित पवार यांनी जगताप कुटुंबीयांना दिले. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जगताप कुटुंबाने अजित पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी अजित पवारांसह शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे आदी उपस्थित होते.

विराज खून प्रकरण: अजित पवारांनी घेतली जगताप कुटुंबाची भेट
पिंपरी-चिंचवडमध्ये 8 जूनला 20 वर्षीय तरुण विराज विलास जगताप याची प्रेमप्रकरणातून 6 जणांनी मिळून हत्या केली होती. या घटनेचे अवघ्या महाराष्ट्रात पडसाद उमटत असून, राजकीय स्तरातूनही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. याप्रकरणी 6 जणांना सांगवी पोलिसांनी अटक केली असून, ते पोलीस कोठडीत आहेत. शनिवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जगताप कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेप्रकरणी प्रेमप्रकरणातील मुलीलासुद्धा आरोपी करावे, अशी मागणी केली होती.
Last Updated :Jun 14, 2020, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.