ETV Bharat / state

आठ दिवसात पीकविमा वाटप करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

author img

By

Published : Dec 8, 2019, 8:17 AM IST

परभणी जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली होती. त्या पावसात सोयाबीन आणि कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतांचे पंचनामे पूर्ण होऊन बरेच दिवस उलटले आहेत, मात्र अजूनही नुकसानग्रस्त पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

परभणी - शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाची प्रक्रिया येत्या आठ दिवसात सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.


परभणी जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली होती. त्या पावसात सोयाबीन आणि कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला होता. या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचा दुराग्रह जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला.

हेही वाचा - VIDEO : अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा

या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या आणि इतर कर्मचाऱ्यांना बेजार करण्यात आले. वास्तविक पाहता प्रशासनातील हे कर्मचारी गावगाड्याशी आणि शेतीशी सर्वांत जास्त जवळीक असणारे असतात. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या केवळ नजर पाहणी अहवालावरुनच झालेले नुकसान ठरवण्यात यायला हवे होते. मात्र, तसे न करता जिल्हा प्रशासनाने वेळ काढू धोरण अवलंबले, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.


शेतांचे पंचनामे पूर्ण होऊन बरेच दिवस उलटले आहेत, मात्र अजूनही नुकसानग्रस्त पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सध्या शेतीमध्ये रब्बी हंगामासाठी पेरणी सुरू आहे. अशावेळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर, काहीअंशी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.


निवेदन देण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोंढे, केशव आरमळ, दिगंबर पवार, रमिभाऊ आवरगंड, संतोष पाते, उस्मान पठाण, बंडु झाडे, चंद्रकांत लोखंडे, बाळासाहेब घाटोळ, माऊली लोडे, हनुमान भरोसे, हनुमान शिंदे हे उपस्थित होते.

Intro:

परभणी - शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम वाटपाची प्रक्रिया येत्या आठ दिवसात सुरु करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना निवेदन दिले आहे.Body:

परभणी जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस तथा अतिवृष्टी झाली होती. त्या पावसात सोयाबीन व कापसाचे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको केला, मोर्चा काढला. त्यामुळे या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने सरसगट पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देेण्याची कार्यवाही करणे अपेक्षीत होते. मात्र तसे न करता प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन फोटोसह पंचनामे करण्याचा दुराग्रह जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. या कामी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या व इतर पदावरील कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन बेजार करण्यात आले. वास्तविक पाहता प्रशासनातील हे कर्मचारी गावगाडयाशी व शेतीशी सर्वात जास्त जवळीक असणारे असतात. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या केवळ नजरी पाहणी अहवालावरुनच झालेले नुकसान ठरवण्यात यायला हवे होते. मात्र तसे न करता जिल्हा प्रशासनाने असे वेळ काढू धोरण का अवलंबविले, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. तसेच या सर्व पंचनामा नाट्याला पुर्ण होऊनही बरेच दिवस उलटले आहेत, मात्र अजूनही नुकसान बाधीत पिकांच्या विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या शेतीतील रब्बी पेरणी सुरु आहे. अशावेळी पिकविमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर काही अंशी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या कामी अधिक वेळ न लावता पिक विम्यांची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी जी काही कार्यवाही राहिली आहे, त्याची पुर्तता करुन येत्या आठ दिवसात सोयाबीन व कापसाच्या पिकविमा रक्कमेचे वाटप शेतकऱ्यांना सुरु करण्यात यावे, अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोंढे, केशव आरमळ, दिगंबर पवार, रमिभाऊ आवरगंड, संतोष पाते, उस्मान पठाण, बंडु झाडे, चंद्रकांत लोखंडे, बाळासाहेब घाटोळ, माऊली लोडे, हनुमान भरोसे, हनुमान शिंदे आदींनी दिला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- निवेदन देताना फोटो.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.