ETV Bharat / state

परभणी आरोग्य विभागाला मिळाल्या 3 नव्या रुग्णवाहिका

author img

By

Published : Apr 2, 2021, 4:22 PM IST

शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नवाब मलिक यांनी सर्वच आमदारांच्या विकास निधीतून परभणी जिल्ह्यासाठी 16 रुग्णवाहिका खरेदी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. आता कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णवाहिकेची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे.

रुग्णवाहिका लोकार्पण
रुग्णवाहिका लोकार्पण

परभणी - गेल्या वर्षी पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यासाठी 16 रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या 7 महिन्यांनंतर यातील 3 रुग्णवाहिकांची आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या निधीतून खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकांचे आज (शुक्रवार) आमदार गुट्टे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याची मागणी
गेल्या वर्षी मे महिन्यानंतर परभणी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर बनली होती. शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नवाब मलिक यांनी सर्वच आमदारांच्या विकास निधीतून परभणी जिल्ह्यासाठी 16 रुग्णवाहिका खरेदी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. आता कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णवाहिकेची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. अनेक ठिकाणी एकाच रुग्णवाहिकेमधून चार ते पाच रुग्ण रुग्णालयात आणले जात आहेत. त्यामुळे आता तरी सर्व आमदारांच्या निधीतून खरेदी करण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत.

आमदार गुट्टे
या तालुक्यांसाठी 3 रुग्णवाहिका
दरम्यान, आज (शुक्रवार) जिल्हा सामान्य रुग्णालयात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधीमधून गंगाखेड, पालम, पूर्णा या तीन तालुक्यातील रुग्णांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.