ETV Bharat / state

पालघर जिल्हा निर्मितीनंतरही माहितीसाठी वाहनधारकांना ठाण्याकडे घ्यावी लागते धाव

author img

By

Published : Jul 30, 2019, 8:55 AM IST

ठाण्या पासून जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र, वाहनचालकांना माहितीसाठी अजुनही ठाणे येथील आरटीओ कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे ठाणे कार्यालयाने जुन्या वाहनांची माहिती वसई कार्यालयाकडे वर्ग करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

जिल्ह्यातील ट्रफिक

पालघर (वाडा)- ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. तरी अद्याप जुन्या शासकीय कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी आणि कामे करून घेण्यासाठी नागरिकांना ठाणे जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रकरणाबाबत माहिती देताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील

जिल्हा तयार झाला आणि काही कार्यालयांच्या कामकाजाचा कार्यभार येथे हाकू लागला. पण जुन्या आरटीओ पासिंग वाहनचालकांना अजुनही ठाणे येथील आरटीओ कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यानंतर वाहनचालकांना पुन्हा जिल्ह्यातील वसई आरटीओ कार्यालयाकडून कामे करून घ्यावी लागत आहे. यात वाहन मालकाचा वेळ, पैसा वाया जात आहे. तसेच त्यांना त्रासही होता आहे. त्यामुळे ठाणे कार्यालयाने जुन्या वाहनांची माहिती वसई कार्यालयाकडे वर्ग करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

याबाबत पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील यांनी ठाणे आरटीओकडून जुन्या वाहनांची माहिती वसई आरटीओ कार्यालयाकडे वर्ग करा असा प्रश्न, नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला आहे. तसेच याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

Intro:जुन्या वाहनधारकांना आरटीओ पासींग अजुनही ठाणे येथील आरटीओ कार्यालयाकडे धाव
जुन्या वाहनाचा डाटा वसई आरटीओ कार्यालयाकडे वर्ग करण्याची मागणी

पालघर (वाडा) संतोष पाटील

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मीती झाली.तरी अद्याप जुन्याच शासकीय कामकाजाची माहितीसाठी आणि कामे करून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याकडे धाव घ्यावी लागत आहे.
जिल्हा तयार झाला काही कार्यालयांचा कामकाजाचा कार्यभार पालघरकडून हाकू लागला पण जुन्या आरटीओ पासींग वाहनचालकांना अजुनही ठाणे येथील आरटीओ कार्यालयात जाऊन पुन्हा पालघर जिल्ह्य़ातील वसई आरटीओ कार्याकडून कामे करून घ्यावी लागतात.यात वाहन मालकाचा वेळ,पैसा आणि ञासही सहन करावा लागत आहे. जुन्या वाहनांची माहिती ठाणे कार्यालयाने वसई कार्यालयाकडे वर्ग करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
याबाबत पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील यांनी ठाणे आरटीओ कडून जुन्या वाहनांची माहीती वसई आरटीओ कार्यालयाकडे वर्ग करा असा प्रश्न नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला आहे. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पञव्यवहार करून मागणी केली आहे.
पालघर जिल्हाची निर्मीती होऊन चारवर्षाहून अधिक काळ लोटला.निर्मितीनंतर विवीध कार्यालये सुरूही झाली.माञ जुन्या कामांची माहितीच्या डेटा व कामकाजासाठी अजूनही ठाणे जिल्ह्यात जावे लागत आहे. याचा प्रत्यय वाहनचालकांना येतोय.
प्रतिक्रिया
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर वसई आरटीओ कार्यालयाकडे पालघर जिल्ह्यातील वाडा,विक्रमगड,जव्हार,मोखाडा हे तालुके जोडण्यात आले मात्र त्यांच्या जुन्या MH- 04 या वाहनांचा डाटा ठाणे आरटीओ कार्यालयाकडे आहे.त्या कार्यालयाची एनओसी घेऊन पुन्हा वसई आरटीओ कार्यालयाकडे यावे लागते.यात वाहनधारकांचा वेळ, पैसा आणि ञासही सहन करावा लागतो.हा सर्व जुन्या वाहनांचा डाटा वसई कडे करावा असा प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला आहे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मागणी त्यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना केली.
नंदकुमार पाटील
पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य
Body:नंदकुमार पाटील
पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य
प्रतिक्रिया video
Conclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.