ETV Bharat / state

Vasai molestation News : चौथीतील मुलीकडं रोज पैसे येऊ लागल्यानं पित्याला संशय, शाळेतील 'त्या' कारनाम्यानं हादरले पालक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 9:59 PM IST

Updated : Sep 13, 2023, 11:01 PM IST

Vasai molestation News
शाळेत मुलीचा विनयभंग

Vasai molestation News : वसई पूर्वेकडील एका शाळेत जेवण बनवण्याचं काम करणाऱ्या एका नराधमानं एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी लैगिंक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोपी राजाराम मौर्य याला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

वसई Vasai molestation News: वसईतील एका शाळेमध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलीकडं खाऊ खाण्यासाठी रोज पैसे जास्त येत असल्यानं पालकांना शंका आली. मुलीकडं दररोज पैसे कुठून येतात, याची खात्री करण्यासाठी मुलीचे पालक शाळेत गेले. तेव्हा राजाराम मौर्य हा तिला खाऊचे आमिष दाखवून लैगिंक चाळे करीत असल्याचे समजले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी हे वालीव पोलिसांना सांगितलंय.

शाळेत मोठा संतप्त जमाव जमा : या घटनेमुळं संतप्त नागरिकांनी शाळेत मोठा संतप्त जमाव जमा झाला होता. त्यांनी आरोपीला यथेच्छ चोप दिलाय. मात्र वालीव पोलिसांनी तत्काळ दाखल होवून प्रसंगावधान राखून आरोपीला मारहाण करणाऱ्या लोकांच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेवून अटक केलीय. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. (molestation News)


आरोपीला यथेच्छ चोप : ५३ वर्षाचा नराधम राजाराम मौर्य हा ९ वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्याशी लगट करून लैंगिक चाळे करीत होता. तो अनेक दिवसांपासून तिला पैसे देत होता. आपल्या मुलीकडे रोज पैसे कुठून येतात, तिला कोण पैसे देतो, का देतो याची चौकशी करण्यासाठी तिचे पालक शाळेत आले होते. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी यथेच्छ चोप दिलाय. (cook molested minor student)

मुलीचा आणि पालकांचा जबाब : आरोपीला कडक शासन करण्याची मागणी स्थानिक पालकांनी केलीय. या घटनेची माहिती मिळताच वसईच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन जमावाला शांत केलंय. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन वालीव पोलीस ठाण्यात आणलंय. पीडित मुलीचा आणि पालकांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या मुलगी सुरक्षित आहे. अफवांना बळी पडू नका. सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी केलंय.


नराधमांना कडक शासन : दरम्यान मनसेच्या पूजा कदम यांनी या किळसवाण्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. शाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याची मागणी कदम यांनी केलीय. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष गीता जाधव यांनी अशा नराधमांना कडक शासन करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केलीय.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime : पत्नीसह मेहुणीची छेड काढल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे केले तुकडे
  2. Molestation In Mumbai Local : लोकलमध्ये महिला असुरक्षित, गेल्या पाच महिन्यात बलात्कार, विनयभंगाच्या घडल्या 'इतक्या' घटना
  3. Video: बहिणीच्या विनयभंगाला भावाने केला विरोध, गुंडांनी बांधून केली मारहाण;व्हिडिओ व्हायरल
Last Updated :Sep 13, 2023, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.