ETV Bharat / state

Minor Girls Physical Abused : धक्कादायक ! चित्रपटांमध्ये काम देण्याचा बहाणा, दोन बालिकांवर आरोपीचा बलात्कार

author img

By

Published : May 11, 2022, 2:30 PM IST

चित्रपटांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने वसईतील दोन दोन बालिकांना आरोपीने जंगलामध्ये नेले होते. त्या ठिकाणी या दोन्ही मुलींवर बलात्कार करण्यात आला. या दोन्ही बालिकांचे वय 13 वर्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Minor Girls Physical Abused
नालासोपारा पोलीस ठाणे

पालघर - चित्रपटांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने वसईतील दोन बालिकांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचाराचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने या बालिकांकडे पैशांची मागणीही केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी - मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस नियंत्रण कक्षातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षापूर्वी आरोपीने दोन बालिकांना वसईमधील जंगलामध्ये नेले होते. त्या ठिकाणी या दोन्ही मुलींवर बलात्कार करण्यात आला. या दोन्ही अल्पवयीन मुलींचे वय 13 वर्ष आहे. आरोपीने मुलींचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 70 हजार रुपयांची मागणी केल्याचे पीडित मुलींनी सांगितल्याची माहितीही यावेळी पोलिसांनी दिली.

आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल - पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलींच्या आईवडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर नालासोपारा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर भादंवी कलम 376, 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 384 आणि 506 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या ( पोक्सो ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.