ETV Bharat / state

गावगाडा हाकण्यासाठी सरपंचांची एकी; लोकनियुक्त सरपंच पालघर तालुक्याला बनवणार विकासाचं मॉडेल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 9:35 AM IST

Sarpanch Meeting : पालघर तालुक्यातील गावं विकासीत करण्यासाठी सरपंचांनी एकत्र येऊन गावगाडा हाकण्याचा निर्धार केलाय. यासाठी सरपंच परिषदेचे अध्यक्ष हेमंत संखे यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं.

Sarpanch Meeting
Sarpanch Meeting

पालघर Sarpanch Meeting : पालघर तालुका विकासाचं मॉडेल बनवण्यासाठी सरपंचांनी एकत्र येऊन गावगाडा हाकण्याचा निर्धार केला केला. सरपंचांना असलेले अधिकार, विकासाचं प्रारुप तयार करण्यासाठी आणि सरपंचांना दिशा देण्यासाठी सरपंच परिषदेचे अध्यक्ष हेमंत संखे यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी पालघर पंचायत समितीत यासंदर्भात एक बैठक बोलवली होती.

80 सरपंचांची उपस्थिती : पालघर तालुक्यात 133 ग्रामपंचायती असून सरपंचांच्या बैठकीला सुमारे 80 ग्रामपंचायतीचे सरपंच यावेळी उपस्थित होते. गावगाडा कसा चालवायचा, गावातील प्रश्न कसे सोडवायचे, अधिकाऱ्यांचा विश्वास कसा संपादन करायचा, गावाच्या विकासासाठी निधी कुठून आणायचा याबाबत अनेक सरपंच अनभिज्ञ असतात. सरपंचांची पालघर जिल्ह्यात प्रभावी अशी संघटना नाही. त्यामुळं संखे यांनी पालघर पंचायत समितीच्या सभागृहात याबाबतची माहिती देण्यासाठी सरपंचांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.

सरपंचांनी अराजकीय काम करावं : सरपंच हा ग्रामविकासाचा दूत असतो. लोकांतून तो निवडून येतो. त्यामुळं लोकांच्या विकासाची जबाबदारी त्याच्यावर असते. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंचानं कुठल्याही राजकीय पक्षाची बूज न ठेवता, केवळ ग्राम विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं, असा सल्ला या परिषदेत संखे यांनी दिला. राज्यात हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, पाटोदा अशा गावांची प्रेरणा घेऊन विकासाची दिशा घ्यावी, त्यासाठी अभ्यास दौरा करावा, यावर या बैठकीत चर्चा झाली.

सहकार्य न केल्यास लोकप्रतिनिधींच्या विरोधात भूमिका : पालघर ग्राम विकासासाठी जे लोकप्रतिनिधी सरपंचांना सहकार्य करतील, त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय सरपंच परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी सरपंचांच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांना कायमचा धडा शिकवण्याचा निर्धार सरपंचांनी या परिषदेत केला. गाव गाड्यावर नियंत्रण ठेवायचं असेल, तर त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींचं सहकार्य आवश्यक असते.

सरपंचांना आपल्या शक्तीचा विसर पडू नये : सरपंचांना आपल्या शक्ती आणि बळाचा विसर पडू नये, याची शिकवण या बैठकीत देण्यात आली. ग्राम पंचायतींना केंद्र सरकारकडून थेट मिळणारा निधी, सरपंचांचे अधिकार, त्यांचे काम, ग्रामविकासाचे विविध प्रस्ताव, वेगवेगळ्या मार्गांनी मिळणारा निधी, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अडचणी, आदी बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. Independence Day : चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशात डंका; 'या' कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार
  2. Vegetable Seller Become A Sarpanch भाजी विक्रेता आता बसणार थेट सरपंच पदाच्या खुर्चीवर, शाहुवाडीतील या तरुणाची सर्वत्र चर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.