ETV Bharat / state

वसईत 'सेक्स रॅकेट' चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

author img

By

Published : Apr 10, 2021, 10:22 PM IST

Updated : Apr 10, 2021, 10:36 PM IST

वसईमध्ये किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर आणि त्याच्या मैत्रिणीला अ‍ॅन्टी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी 4 हाय प्रोफाईल पीडित मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.

पोलीस व आरोपी
पोलीस व आरोपी

वसई (पालघर) - वसईमध्ये किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर आणि त्याच्या मैत्रिणीला अ‍ॅन्टी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी 4 हाय प्रोफाईल पीडित मुलींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.

बोलताना पोलीस निरीक्षक

वसई येथील नवघर माणिकपूर एसटी बस डेपो जवळ एक महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींना घेवून येणार असल्याची माहिती अ‍ॅन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या सहायक फौजदार प्रकाश निकम यांना मिळाली होती. त्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना दिली. त्यानंतर त्यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून एका महिलेला अटक केली. चार पीडितांची सुटका केली.

या प्रकरणात मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दलाल जिया सावदेकर आणि सुरज उर्फ संदीप पाल याची किंडर अ‍ॅपवरून ओळख झाली. दोघांची मैत्री झाली तिला मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे तुला चांगल्या पगाराची नोकरी देतो तुला सेल्समनचे काम करावे लागेल, असे सांगितले. दोघांनी एकत्र फोटो काढले होते. काही दिवसांनी तुला भरपूर पैसा मिळेल ग्राहकाकडे जावून त्याला खुश करायचे, असे जियाला सांगितले. मात्र, तिने याला नकार दिला. त्यानंतर तिला एडीट केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून जियाला वेश्या व्यवसायात आणून तिला तिच्या मैत्रिणीला या व्यवसायात आणले.

आरोपी संदीप पाल हा ओएलएक्सवर नोकरी शोधणाऱ्या सुशिक्षित मुलींना पर्सनल सेक्रेटरीची नोकरी मिळेल, असे सांगून त्यांच्या कडून त्यांचे फोटो मागवून घ्यायचा महिन्याला 30 ते 50 हजार आणि इतर सुविधा मिळतील, असे सांगून आपल्या जाळ्यात ओढायचा. त्या मुली आल्यानंतर त्यांना तुम्हाला फिल्डवर्क करून ग्राहकांना सर्व्हिस द्यायची असे सांगायचा. ज्या मुलींना हे आवडल नाही तर त्या मुली त्याला ब्लॉक करायच्या मग अशा मुलींना तो दुसऱ्या नंबर वरून संपर्क साधून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, त्यानंतर नाईलाजाने त्या मुली वेश्या व्यवसायात अडकत गेल्या.

किंडर अ‍ॅपवरून ग्राहकांशी संपर्क करून तो त्या मुलींना ग्राहकांकडे पाठवायचा. त्या गुरुवारी (दि. 8 एप्रिल) वसईला येणार असल्याची माहिती सहायक फौजदार प्रकाश निकम यांनी एका सामाजिक संस्थेच्या रवींद्र सिंह यांच्या मदतीने सापळा रचना. त्यानंतर नालासोपारा येथील अनैतिक वाहतूक शाखेत आणून चौकशी केली असता तिने तिच्या म्होरक्या विषयी माहिती दिली.

नोकरीसाठी कोणत्याही सोशल साईटवर, डेटिंग अ‍ॅपवर कोणत्याही मुलींनी आपली वैयक्तिक माहिती, फोटो अपलोड करू नका. समोरचा व्यक्ती कोण आहे हे तपासून पाहावे ओळखी शिवाय अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देऊ नये व बळी पडू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांनी केले आहे.

हेही वाचा - महापालिका बसमध्ये प्रवाशांची गर्दी, कोरोनाचा धोका वाढला

Last Updated : Apr 10, 2021, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.