ETV Bharat / state

एन्काउंटर स्पेशालिस्ट 'प्रदीप शर्मा' शिवसेनेचे भावी आमदार? नालासोपाऱ्यात कार्यकर्त्यांची ब‌ॅनरबाजी

author img

By

Published : Aug 23, 2019, 11:51 AM IST

शिवसेनेतर्फे नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनाकडून होत आहे. शहरात प्रदीप शर्मांच्या उमेदवारीसाठी जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. त्यावर शर्मा यांचा उल्लेख भावी आमदार असा केला जात आहे.

प्रदीप शर्मा यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळण्याची संधी

पालघर/नालासोपारा - बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नालासोपारा विधानसभा क्षेत्राला खिंडार पाडण्याची तयारी शिवसेनेने केल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. शर्मा यांचा पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा अजून मंजूर झाला नसला, तरीही त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट 'प्रदीप शर्मा' शिवसेनेचे भावी आमदार ? नालासोपाऱ्यात कार्यकर्त्यांची ब‌ॅनरबाजी

एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर परिसरात राहणाऱ्या कोकणी जनतेला गळाला लावण्यासाठी शर्माचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. कोकणातल्या जनतेसाठी अवघ्या १०० ते २०० रुपयात कोकण प्रवासाचे गाजर शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते दाखवत आहेत. त्यासाठी नालासोपारा आणि विरार शहरात ५० बसेसही तयार ठेवण्यात आल्या आहेत. गोविंदा पथकांसाठीही शर्मांचा फोटो छापलेले टी-शर्ट मोठ्या प्रमाणात वाटले जात आहेत.

नालासोपाऱ्यात पीएस फाउंडेशनच्या वतीने छत्रीवाटपापासून सुरू झालेला प्रचार आता दहीहंडी उत्सव ते गणेशोत्सव उत्सवापर्यंत पोहोचला आहे. शहरात प्रदिप शर्मा यांच्यासाठी बॅनरबाजी सुरू आहे. त्यावर शर्मा यांचा उल्लेख भावी आमदार असा केला जात आहे.

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची कारकिर्द...

प्रदीप शर्मांची चकमकफेक अधिकारी अशी ओळख आहे. १९८३ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलात दाखल झाले. त्यांनी आत्तापर्यंत १०० हून अधिक गुन्हेगारांचे एन्काउंटर केले आहे. गुंड विनोद मटकरचे शर्मा यांनी केलेले एन्काउंटर विशेष गाजले. परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या कुख्यात गुंडांचाही खात्मा शर्मा यांनीच केला केला आहे. लखनभैय्या बनावट चकमकप्रकरणी शर्मांना अटक करण्यात आली होती. २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

निवडणुकीच्या रिंगणात शर्मा उतरले तर वसईतील गुन्हेगारी आणि घराणेशाही संपुष्टात येईल, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. वसई नालासोपारा हा भाग एकेकाळी संघटीत गुन्हेगारीमुळे कुख्यात झालेला भाग. त्यात जर आमदार म्हणून शर्मा यांच्यासारखा अधिकारी मिळाला तर या भागाचा विकास होईल, असा प्रचार सेनेतर्फे केला जात आहे.

Intro:इन्काऊंटर स्पेशालिस्ट 'प्रदीप शर्मां' शिवसेनेचे भावी आमदार ? नालासोपाऱ्यात जोरदार  प्रचार मोहीम Body:इन्काऊंटर स्पेशालिस्ट 'प्रदीप शर्मां' शिवसेनेचे भावी आमदार ? नालासोपाऱ्यात जोरदार  प्रचार मोहीम 


छत्र्या, दहीहंडीनंतर थेट २०० रुपयांत कोकण प्रवास

विपुल पाटील
पालघर /वसई

चकमकफेक पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आता निवडणुकीचे वेध लागलेत. नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली. एवढंच नाही तर परिसरात राहणाऱ्या कोकणी जनतेला गळाला लावण्यासाठी शर्मांनी विशेष प्रयत्न सुरू केलेत. 
बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समज up ल्या जाणाऱ्या नालासोपारा विधानसभा क्षेत्राला खिंडार पाडण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी चकमकफेक पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. शर्मांचा पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा अजून मंजूर झाला नसला तरी शर्मांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते सक्रीय झालेत. नालासोपाऱ्यात पीएस फाऊंडेशनच्या वतीने छत्रीवाटपापासून सुरू झालेला प्रचार दहीहंडी उत्सव ते गणेशोत्सव उत्सवापर्यंत पोहोचलाय. शहरात प्रचंड शर्मांची बॅनरबाजी सुरू असून त्यावर शर्मांचा उल्लेख भावी आमदार असा केला जात आहे. नालासोपारा मतदारसंघात राहणाऱ्या कोकणातल्या जनतेसाठी अवघ्या १०० ते २०० रूपयांत कोकण प्रवासाचे गाजर शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते दाखवत आहेत. त्यासाठी नालासोपारा आणि विरार शहरात ५० बसेसही तयार ठेवण्यात आल्या आहेत. नोंदणीला नागरिकांचा प्रतिसादही तुफान मिळतोय. गोविंदा पथकांसाठी शर्मांचा फोटो छापलेले टी शर्ट मोठ्या प्रमाणात वाटले जात आहेत. प्रदीप शर्मांची चकमकफेक अधिकारी अशी ओळख आहे. १९८३ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलात दाखल झाले. शर्मांनी आत्तापर्यंत १०० हून अधिक गुन्हेगारांचं एन्काऊंटर केले आहे. गुंड विनोद मटकरचं शर्मांनी केलेले एन्काऊंटर विशेष गाजले. परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या कुख्यात गुंडांचाही शर्मांनी खात्मा केला. लष्कर ए तैबाच्या तीन दहशतवाद्यांचाही शर्मांनी खात्मा केलाय. २००८ मध्ये शर्मा पोलीस दलातून निलंबीत झाले. लखनभय्या बनावट चकमकप्रकरणी शर्मांना अटक करण्यात आली. २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शर्मांची मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक आरोपांमधूनही शर्मांची मुक्तता करण्यात आली.निवडणुकीच्या रिंगणात शर्मा उतरले तर वसईतली गुन्हेगारी आणि घराणेशाही संपुष्टात आणतील असा दावा शिवसेना करतंय. वसई नालासोपारा हा भाग एकेकाळी संघटीत गुन्हेगारीमुळे कुख्यात झालेला भाग. त्यात आमदार म्हणून शर्मांसारखा चकमकफेम अधिकारी हवा असा प्रचार सेनेतर्फे केला जात आहे...


प्रतिक्रिया
प्रमोद दळवी, नालासोपारा विधानसभा संघटक, शिवसेना.

शिवसेनेतर्फे  नालासोपाऱ्यात इन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी शवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह   व विविध संघटनांमधून होत आहे... प्रदीप शर्मांसारखा सक्षम उमेदवार मिळाल्यास  सुरू असलेली गुंडगिरी संपुष्टात येईल..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.