ETV Bharat / state

पालघरातील शेतकऱ्यांना विमा मिळण्यास दिरंगाई; शेतकरी संतापले

author img

By

Published : Dec 1, 2019, 10:01 PM IST

संकटकाळी पीकविमा फायद्याचा ठरत नसल्याची ओरड शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विविध अटी व नियमांचा अडथळा निर्माण केल्या जातो. त्यामुळे विमा मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगितले जात आहे.

palghar
शेत

पालघर- भात पिकांना संरक्षित करण्यासाठी शेतकरी वर्ग पीकविमा उतरवित असतो. हा पीकविमा शेतकरी वर्ग स्वेच्छेने काढत असतो. मात्र, काढलेला पीकविमा संकटकाळी फायद्याचा ठरत नसल्याची ओरड शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विविध अटी व नियमांचा अडथळा निर्माण केल्या जातो. त्यामुळे विमा मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया देताना पालघर जिल्ह्यातील शेतकरी

नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचा खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचा विमा उतरविला जातो. यात खरीप हंगामातील भात पिकांचा विमा सेवा सहकारी संस्था बँकेच्या माध्यमातून खाजगी पिकविमा कंपन्यांकडून उतरविला जातो. सक्तीचा पीकविमा नसल्याने काही शेतकरीवर्गाकडून पीकविमा उतरविला जात नाही. मात्र, जे शेतकरी दरवर्षी पीकविमा उतरविताता त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात विमा कंपन्यांकडून विमा मिळत नाही. विमा देण्यात कंपन्यांकडून दिरंगाई केली जाते, अशी तक्रार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

वाडा तालुक्यात ७ नोव्हेंबरपर्यंत बाधित शेतकऱ्यांमध्ये पीकविमा उतरविलेले आणि अर्ज प्राप्त झालेल्या शेतकरीवर्गाची संख्या ३ हजार ८१५ होती. यात पंचनामे झालेले ३४५० शेतकरी असून पंचनामा झालेले क्षेत्र २३८० हेक्टर होते. पुढे पंचनामे वाढतील तसे क्षेत्र आणि शेतकरी संख्या वाढेल, अशी कृषी कार्यालयाकडून माहिती देण्यात आली होती. फळपिके असोत किंवा भात पिके, त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमा हा नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाला दिलासादायक ठरत असतो. मात्र, संकट काळी विमा कंपन्यांकडून पीकविमा न मिळने किंवा विमा देण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीकविमा लवकरात लवकर देण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा- पालघरच्या दहा गावांतील पाण्याचे स्त्रोत दुषित, नागरिकांचे जीव धोक्यात

Intro:पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते, संकटकाळी पीकविमा लवकर मिळत नाही.तर लाभही मिळत नाही शेतकऱ्यांची ओरड पालघर ( वाडा ) संतोष पाटील  भातपिकांना संरक्षित करण्यासाठी शेतकरीवर्ग पीकविमा उतरवित असतो.हा पीकविमा शेतकरी वर्ग स्वेच्छेने काढत असतो.माञ हा पीकविमा संकटकाळी शेतकरीवर्गाला फायद्याचा ठरत नसल्याची ओरड शेतकरीवर्गाकडून केली जातेय.पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना  विवीध अटी व नियमांची अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगितले जाते. नैसर्गिक आपत्तीत शेतकरीवर्गाचा खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचा विमा उतरविला जातो.यात खरीप हंगामातील भातपिकांचा विमा सेवा सहकारी संस्था बॅकेच्यामाध्यमातून खाजगी पिकविमा कंपन्यांकडून उतरवित असतात.सक्तीचा पीकविमा नसल्याने काही शेतकरीवर्गाकडून पीकविमा उतरविला जात नाही.पण दरवर्षी पीकविमा उतरवित असलेल्या शेतकरीवर्गाला नैसर्गिक आपत्तीच्या काळात विमा मिळविण्यासाठी कंपन्या दिरंगाई करीत आहेत.व उतरविलेला विमा नुकसानकाळात मिळत नाही. अशी ओरड शेतकरी करीत असतात. यावर्षी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त  पीकविमा धारक शेतकरीवर्गाचे नुकसान झाले.त्याचे पंचनामे झाले माञ अवकाळी पावसाने कीती बाधीत क्षेञाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात नाही. तसेच अडीअडचणी निर्माण करून शेतकऱ्यांना  विमा कंपन्या तातडीने पीकविम्याचा फायदा देण्यास असमर्थ ठरत आहेत. पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील 7 नोव्हेंबर पर्यंत बाधीत शेतकऱ्यांमध्ये पीकविमा उतरविले आणि अर्ज प्राप्त झालेल्या शेतकरीवर्गाची संख्या 3 हजार 815 होती. यात पंचनामे झालेले 3450 शेतकरी असून पंचनामा झालेले क्षेञ 2380 हेक्टर होते.यानंतर पुढे पंचनामे वाढतील तसे  क्षेञ  आणि शेतकरी संख्या वाढेल असे कृषी कार्यालयाकडून  माहीती देण्यात येत होती.  फळपिके असोत किंवा भातपिकांना सुरक्षिततेसाठी विमा हा नैसर्गिक आपत्तीत शेतकरीवर्गाला दिलासादायक ठरत असतो.माञ हा पीकविम्याचा  फायदा संकटकाळी उशीरा किंवा मिळत नाही असा आरोप शेतकरीवर्गाकडून होत आहे.   


Body:visual farmer 1) raju patil 2)tukaram padavle


Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.