ETV Bharat / state

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, पालघरमध्ये ओबीसी संघर्ष समितीचे आंदोलन

author img

By

Published : Nov 3, 2020, 7:02 PM IST

Updated : Nov 3, 2020, 7:53 PM IST

ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे, यासह इतर मागण्यांसाठी वाडा तहसील कार्यालयासमोर ओबीसी संघर्ष समन्वय समितीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

OBC caste wise census demand Palghar
पालघरमध्ये ओबीसी संघर्ष समितीचे आंदोलन

पालघर - ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीकडून आज जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. वाडा तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माहिती देताना दत्तात्रेय पतारे

२०२१ला जनगणना होणार असून यात ओबीसींची जात निहाय जनगणना करावी, ओबीसींच्या महाज्योती संस्थेला १० हजार कोटीची तरतूद करण्यात यावी, मराठा समाजाचे ओबीसीमध्ये समावेश नको, तसेच राज्यात १०० बिंदू नामावली लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. वाडा तहसीलदार उद्धव कदम यांना मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

जातनिहाय जनगणना पुन्हा होणे गरजेचे

१९३१ला जातनिहाय जनगणना झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत अशी जनगणना झाली नाही. ओबीसींच्या मागण्यांसाठी आजवर अनेकदा मोर्चे आणि आंदोलने झालीत. मात्र, मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही, असे सांगत आंदोलनकर्त्यांनी खंत व्यक्त केली. जिल्ह्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

हेही वाचा- मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Last Updated : Nov 3, 2020, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.