ETV Bharat / state

पीपीई कीटसाठी मृतांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपयांची वसुली

author img

By

Published : Apr 26, 2021, 1:44 PM IST

कर्मचारी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 7 पीपीई कीटची मागणी करून नातेवाईकांकडून हजारो रुपये घेत आहेत. मुळात पालिकेने हे कीट मोफत देत असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले जात आहेत.
पीपीई कीटसाठी मृतांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपयांची वसुली
पीपीई कीटसाठी मृतांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपयांची वसुली

पालघर/वसई - वसई विरार शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीतही कोरोना मृतांच्या नातेवाईकांची खासगी रुग्णालयांनी लूट सुरू केली आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या नावाखाली पीपीई कीटसाठी मृतांच्या नातेवाईकांकडून ७ कीटसाठी ४५०० रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ८०० हून रुग्ण दिवसाला बाधित होत आहेत. त्याच प्रमाणात दिवसाला २० ते ३० रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यांच्यावर पालिकेतर्फे अंत्यसंस्कार केले जात आहे. कोरोनाबाधित आणि संशयित रुग्ण असल्यास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. रुग्णालयातर्फे पूर्णतः गुंडाळून तो पालिकेच्या ताब्यात दिला जातो.

एका मृतदेहावर अंत्यसंस्कारसाठी 7 पीपीई कीटची मागणी

यावेळी या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेतर्फे स्मशानभूमीत आणि रुग्णवाहीकेवर कर्मचारी नेमलेले आहेत. हे कर्मचारी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 7 पीपीई कीटची मागणी करून नातेवाईकांकडून हजारो रुपये घेत आहेत. मुळात पालिकेने हे कीट मोफत देत असल्याची माहिती पालिकेने दिली असतानाही रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले जात आहेत.

पीपीई कीटसाठी ४५०० रुपये उकळले

पश्चिम रेल्वेचे कर्मचारी अजय परब यांच्या वडिलांचा १६ एप्रिल रोजी कोरोनाने मृत्यू झाला. यावेळी पालिकेच्या रुग्णवाहिकेकडून पीपीई कीटसाठी ४५०० रुपये मागितले. विशेष बाब म्हणजे याचे कोणतेही देयक त्यांनी मागूनही त्यांना देण्यात आले नाही. परब यांनी माहिती दिली की, त्यांना रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याने हे पैसे पीपीई कीटसाठी मागितले. ते दुखात असल्याने त्यांनी कोणताही वाद न करता हे पैसे दिले. पण नंतर त्यांना माहिती मिळाली की पालिका पीपीई कीट मोफत देत आहेत.

दिवसाला २० ते ३० मृत्यू होत आहेत. त्यात सर्व रुग्णाच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे पैसे मागितले जात आहेत. यामुळे रुग्णालयांनी आणि रुग्णवाहिका चालकांनी नागरिकांची लुट चालविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पालिकेने अशा प्रकारे पैसे स्वीकारल्याचे आरोप फेटाळले असून सर्व मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट महापालिका मोफत देत आहेत, असे सांगितले. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास मनाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.