ETV Bharat / state

Kiran Gosavi Police Custody : पालघरमधील दोन तरुणांची फसवणूक प्रकरणी किरण गोसावीला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

author img

By

Published : Dec 2, 2021, 5:28 PM IST

Updated : Dec 2, 2021, 7:40 PM IST

किरण गोवासीला घेवून जातांना पोलीस
किरण गोवासीला घेवून जातांना पोलीस

एडवण येथील दोन तरुणांची परदेशात नोकरी देतो असे सांगून 1 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Case Registered at Kelve Police Station ) करण्यात आला होता. याप्रकरणी काल (बुधवारी) रात्री उशिरा केळवे पोलिसांनी गोसावीला ताब्यात घेतले. किरण गोसावी ( Kiran Gosavi ) याला आज (गुरुवारी) पालघर दिवाणी न्यायालयासमोर ( Palghar Civil Court ) हजर केल असता, पोलिसांकडून 12 दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने गोसावी याला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पालघर - आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील ( Aryan Khan Drugs Case ) वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी ( Witness Kiran Gosavi ) याला पालघरमधील तरुणांची फसवणूक प्रकरणी न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पालघर तालुक्यातील एडवण येथील दोन तरुणांची परदेशात नोकरी देतो असे सांगून 1 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Case Registered at Kelve Police Station ) करण्यात आला होता. याप्रकरणी काल (बुधवारी) रात्री उशिरा केळवे पोलिसांनी गोसावीला ताब्यात घेतले. किरण गोसावी ( Kiran Gosavi ) याला आज (गुरुवारी) पालघर दिवाणी न्यायालयासमोर ( Palghar Civil Court ) हजर केल असता, पोलिसांकडून 12 दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने गोसावी याला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

माहिती देतांना गोसावी यांच्या वकिल

परदेशात नोकरीच्या बहाण्याने गोसावीने घातला होता गंडा

पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांची त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावी उकळले. उत्कर्ष व आदर्श हे दोन तरुण दोन-तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावी याची त्यांच्याशी सुरुवातीला फेसबुकवरून मैत्री झाली. उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो, असे सांगितल्यानंतर दोघांकडून गोसावी याने 1 लाख 65 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावी याच्या के.पी. इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व विजा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व विजा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही धक्का बसला. तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रारी अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळ खात पडून होते.

आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनविल्यानंतर वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्या दरम्यान आर्यन खानसोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावी याला उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे. याची खात्री त्यांना पटली आणि दोन्ही तरुणांनी तत्काळ केळवे पोलीस स्टेशन गाठून आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादंवि कलम 420,406, 465,467,471 कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - Sanjay Raut Allegations On BJP : …तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत; संजय राऊतांनी सुनावले

Last Updated :Dec 2, 2021, 7:40 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.