ETV Bharat / state

Khelo India Training Centre : खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून दर्जेदार खेळाडू घडतील - पालकमंत्री

author img

By

Published : Nov 14, 2022, 10:16 PM IST

खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून ( Khelo India Training Centre ) दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ( Food Civil Supplies Minister Ravindra Chavan ) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण ( Palghar District Guardian Minister Ravindra Chavan ) यांनी व्यक्त केला आहे.

Khelo India Training Centre
Khelo India Training Centre

पालघर - खेलो इंडिया ( Khelo India Training Centre ) या योजनेतून देशामध्ये 1 हजार खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र ( Khelo India Training Centre ) निर्माण करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी बॉक्सींग प्रशिक्षण केंद्र ( Boxing Training Center for Palghar District ) स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. या प्रशिक्षण केंद्रामधून दर्जेदार गुणवंत खेळाडू घडतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ( Food Civil Supplies Minister Ravindra Chavan ) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण ( Palghar District Guardian Minister Ravindra Chavan ) यांनी व्यक्त केला.

Guardian Minister Ravindra Chavan
पालकमंत्री रविंद्र चव्हाण

बॉक्सींग रिंगचे उद्घाटन - खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्रातील अद्यावत बॉक्सींग रिंगचे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, पालघरच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुहास व्हनमाने आणि मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू - आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी खेळाडुंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम प्रशिक्षक आवश्यक असते तसेच उत्तम दर्जाचा आहार आवश्यक असतो. खेलो इंडियाच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रातून या सर्व बाबी पुरविल्या जातील. खेळाडू घडविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनीही हातभार लावून उत्तम खेळाडू घडविण्यासाठी योगदान द्यावा असेही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.