ETV Bharat / state

खासगी कोरोना रुग्णालयाचा बेजबाबदारपणा; जैववैद्यकीय कचरा फेकला कचराकुंडीत

author img

By

Published : Apr 26, 2021, 9:22 AM IST

केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र कोरोना काळात बोईसरमध्ये त्याला खो बसत आहे. चिन्मय कोविड रुग्णालयाकडून बोईसर चित्रालय रस्त्यावर कोरोना रुग्णाच्या उपचारादरम्यान पीपीई किट, सलाईन, सुई, रक्ताळलेले बँडेज या वापरलेल्या सर्व घातक वस्तु ग्रामपंचायतीच्या कचराकुंडीत फेकण्यात आले आहे.

chinmay hospital in boisar,  चिन्मय हॉस्पिटल बोईसर , बोईसर कोरोना
बोईसर येथील खासगी कोरोना रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर...

पालघर - कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोईसरमधील चिन्मय रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. बोईसरमधील चिन्मय रुगणालायत सध्या कोव्हीड रुग्णांवर उपचार केले जात असून सध्या या रुग्णालयात 20 ते 25 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, या रुग्णालयातील जैव- वैद्यकीय कचरा खुलेआम ग्रामपंचायतच्या कचराकुंडीत टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या पालघर सारख्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना पहायला मिळत असून या रुग्णालयांच्या निष्काळजी पणामुळे त्यात आणखी भर पडणार असल्याची भीती बोईसर शहरात पसरली आहे. ग्रामपंचायतीकडून चिन्मय रुग्णालयाला नोटीस देण्यात आली असून पुन्हा अशी बाब आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतकडून देण्यात आला आहे.

रुग्णालयाने फेकला जैव वैद्यकीय कचरा ग्रामपंचायत कचराकुंडीत -

केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र कोरोना काळात बोईसरमध्ये त्याला खो बसत आहे. चिन्मय कोविड रुग्णालयाकडून बोईसर चित्रालय रस्त्यावर कोरोना रुग्णाच्या उपचारादरम्यान पीपीई किट, सलाईन, सुई, रक्ताळलेले बँडेज या वापरलेल्या सर्व घातक वस्तु ग्रामपंचायतीच्या कचराकुंडीत फेकण्यात आले आहे.

बोईसर येथील खासगी कोरोना रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर...

बोईसर ग्रामपंचायतीकडून देण्यात आली रुग्णालयाला नोटीस -

बोईसर येथील चिन्मय कोविड रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट कचरा उघड़्यावर व कचराकुंडीत टाकला जात आसल्याने बोईसर ग्रामपंचायतीकडून चिन्मय रुग्णालयांस नोटीस देण्यात आली आहे. रुग्णालयाकडून पुन्हा असा हलगर्जीपणा समोर आल्यास कारवाईचा इशारा ग्रामपंचायत मार्फत रुग्णालयाला देण्यात आला आहे.

विरार येथील जळीत कांड प्रकरण; गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने केली दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.