ETV Bharat / state

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

author img

By

Published : Dec 9, 2020, 10:14 PM IST

Updated : Dec 10, 2020, 1:23 AM IST

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. उद्या पालघर जिल्ह्यातल्या वाडामध्ये दुपारी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून देण्यात आली आहे.

Vishnu Savara passes away
विष्णू सावरा यांचे निधन

पालघर - माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले आहे. उद्या पालघर जिल्ह्यातल्या वाडामध्ये दुपारी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून देण्यात आली आहे.

1980 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र याहीवेळेस त्यांचा पराभव झाला. सलग दोनवेळा पराभव होऊन देखील, पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र यावेळी ते विजयी झाले. 1990 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी ते वाडा विधानसभा आणि भिवंडी ग्रामीण आणि विक्रमगड विधानसभा मतदार संघ असे एकूण 6 वेळा लोकप्रतिनिधित्व केले आहे. युतीच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात PESA कायदा राज्यात लागू केला.

Last Updated : Dec 10, 2020, 1:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.