ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सायलेंट रिसॉर्टजवळ हेल्मेटधारक दुचाकीस्वाराचा जीवघेणा गोळीबार

author img

By

Published : Dec 12, 2019, 7:52 AM IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील सायलेंट रिसॉर्टनजीक हेल्मेटधारक दुचाकीस्वाराने एका व्यक्तीवर जीवघेणा गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच गोळीबार झाल्याची अशी घटना समोर आली आहे.

car
दुचाकीस्वाराचा जीवघेणा गोळीबार

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील मनोर येथील सायलेंट रिसॉर्टजवळ भरदिवसा सुजित पाटकर नामक व्यक्तीवर जीवघेणा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच गोळीबार झाल्याची अशी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका गाडीवर जीवघेणा गोळीबार

मुळचे कलिना (मुंबई) येथील रहिवासी असलेले सुजित पाटकर सदनिका खरेदी करण्याच्या हेतूने, सदनिका पाहण्यासाठी बुधवारी पालघर येथे आले होते. सदनिका पाहून कलिना येथील आपल्या घरी परतताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील सायलेंट रिसॉर्टनजीक मागून येणाऱ्या हेल्मेटधारक एक दुचाकीस्वार दुपारी साडेतीन पावणे चारच्या सुमारास त्यांना सिग्नल देऊ लागला. त्यानंतर दुचाकीस्वाराने पाटकर यांच्या कारला ओव्हरटेक करत त्यांची कार थांबवून त्यांच्यावर गोळीबार केला. दुचाकीस्वार आपल्या हातात बंदुक घेऊन आपल्यावर गोळी झाडणार ही बाब पाटकर यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी पुढे घेतली. त्यामुळे दुचाकीस्वाराने झाडलेली गोळी त्यांच्या गाडीच्या मागच्या काचेला लागली व गोळीबार करून तो फरार झाला. थोडक्यात बचावलेल्या पाटकर यांनी तत्काळ मनोर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

हेही वाचा - 'भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला 5 लाखांचा दंड आणि 5 वर्षांचा तुरूंगवास'

या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोळीबार करण्याचा असा प्रकार पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. हा गोळीबार व्यवसायिक विरोधकांकडून करण्यात आल्याचा संशय पाटकर यांनी व्यक्त केला आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करा; शिलटे शाळेच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Intro:मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट नजीक हेल्मेट धारक दुचाकीस्वाराचा एका इसमावर जीवघेणा गोळीबार
Body:    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट नजीक हेल्मेट धारक दुचाकीस्वाराचा एका इसमावर जीवघेणा गोळीबार


नमित पाटील,
पालघर, दि.12/12/2019


    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट नजीक  भरदिवसा एका इसमावर जीवघेणा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच गोळीबार झाल्याची अशी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.


     मुळचे कलिना (मुंबई) येथील रहिवासी असलेले सुजित पाटकर सदनिका खरेदी करण्याच्या हेतूने, सदनिका पाहण्यासाठी बुधवारी पालघर येथे आले होते. सदनिका पाहून कलिना येथील आपल्या घरी परतत असताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथील सायलेंट रिसॉर्टनजीक मागून येणाऱ्या हेल्मेट धारक एक दुचाकीस्वार दुपारी साडेतीन पावणे चार वाजताच्या सुमारास त्यांना सिग्नल देऊ लागला.  त्यानंतर दुचाकीस्वाराने पाटकर यांच्या कारला ओव्हरटेक करत त्याांची कार थांबवून त्यांच्यावर गोळीबार केला. दुचाकीस्वार आपल्या हातात बंदूक घेऊन आपल्यावर गोळी झाडणार ही बाब पाटकर यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी पुढे घेतली. त्यामुळे बाईकस्वाराने झाडलेली गोळी त्यांच्या गाडीच्या मागच्या काचेला लागली व गोळीबार करून दुचाकीस्वार फरार झाला.  थोडक्यात बचावलेल्या पाटकर यांनी लगेचच मनोर पोलिस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.

    या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोळीबार करण्याचा असा प्रकार पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. हा गोळीबार व्यवसायिक विरोधकांकडून करण्यात आल्याचा संशय पाटकर यांनी व्यक्त केला आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


Byte: -
विकास नाईक - उपविभागीय पोलीस आधिकारी, पालघर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.