ETV Bharat / state

गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण : न्यायालयाकडून ५४ आरोपींचा जामीन मंजूर

author img

By

Published : Nov 27, 2020, 4:45 PM IST

देशभर गाजलेल्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. गडचिंचलेत चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या प्रकरणातील एकूण आरोपींपैकी ५४ आरोपींचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Gadchinchle triple murder case
गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण

पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या प्रकरणातील एकूण आरोपींपैकी ५४ आरोपींचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाणे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी या प्रकरणातील ५४ आरोपींची १५ हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

आरोपीच्या वतीने अपील करताना वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी या घटनेत या आरोपींची काही भूमिका नाही आणि केवळ संशयाच्या आधारेच त्यांना अटक केली असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. या सुनावणीत फिर्यादी वतीने विशेष सरकारी वकील सतीश मानेशिंदे हजर झाले, तर मृत पीडित साधूंच्या कुटूंबाच्या वतीने अ‍ॅड. पी. एन. ओझा हजर झाले.

गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण -

१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला होता. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात आला. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.