ETV Bharat / state

Christmas Celebrations In Vasai : मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत ख्रिसमसचा उत्साह

author img

By

Published : Dec 25, 2021, 9:37 PM IST

नाताळ सणाच्या निमित्ताने वसई- विरारमधील ( Christmas Celebrations Vasai Virar ) चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकत्र येत प्रार्थना केली. एकमेकांना सणाच्या शुभेच्छाही ( Christmas Wishes ) दिल्या. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे ( Government Guidelines Covid 19 ) पालन करून हा सण साजरा करण्यात आला.

ख्रिसमसचा उत्साह
ख्रिसमसचा उत्साह

विरार - प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव म्हणजे नाताळच्या स्वागतासाठी ( Christmas Celebrations Vasai Virar ) वसई- विरार मधील सर्वच चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती. येथील चर्चेसवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोविड नियमांचे ( Government Guidelines Covid 19 ) पालन करून सण साजरा करण्यात येत आहे.

मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत ख्रिसमसचा उत्साह


सगळीकडे नाताळचा उत्साह

संपूर्ण वसईच्या गावोगावी ख्रिस्ती धर्मीयांकडून प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा म्हणजे नाताळचा उत्साह साजरा करण्यात येत आहे. येशू ख्रिस्त यांचा जन्म हा गायीच्या गोठ्यात झाला असल्याने, घरोघरी तसेच गावोगावी येशू ख्रिस्त यांच्या जन्म सोहळ्याचा देखावा साकारण्यात येत असतो. हा देखावा ख्रिसमसमध्ये सर्वांचे आकर्षणबिंदू असतो. वसईतील भुईगाव गावातील ग्रामस्थांनी एकत्र जमून या गोठ्यांसमोर पारंपरिक पद्धतीने गीत- गाणी गात प्रार्थना केली.
कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना

नाताळच्या पूर्वसंध्येला शासनाने आखून दिलेल्या सर्व कोविड नियमांचे पालन करून प्रत्येक चर्चमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला. जवळपास दोन वर्षांनी चर्चमध्ये एकत्र जमल्यामुळे या सणाचा उत्साहच काही और असल्याने ख्रिस्ती बांधवानी एकमेकांना ख्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या ( Christmas Wishes ) आहेत. विरार पूर्वेच्या मनवेल पाडा परिसरात असलेल्या डॉन बोस्को चर्चमध्ये संचारबंदीच्या आधीच हा सण साजरा करण्यात आला आहे. देशावर येणारे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी सर्वांकडून प्रार्थना करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.