ETV Bharat / state

Aftab Statue Hanged : आफताबच्या प्रतिकात्मक पुतळ्याला अंबाडी ब्रिजवर फाशी; पोलिसांनी जप्त केला पुतळा

author img

By

Published : Nov 16, 2022, 9:38 PM IST

पालघर : श्रद्धाची क्रूरपणे हत्या Shraddha Walkar Murder Case करणाऱ्या आरोपी आफताबच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी Aftab statue hang on ambadi bridge वसईत देण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फाशी दिलेला पुतळा अंबाडी ब्रीजवर लावण्यात आला होता. Aftab statue confiscated, latest news from Palghar, Palghar News

Aftab Statue Hanged
आफताबच्या पुतळ्याला फाशी

पालघर : श्रद्धाची क्रूरपणे हत्या Shraddha Walkar Murder Case करणाऱ्या आरोपी आफताबच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी Aftab statue hang on ambadi bridge वसईत देण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फाशी दिलेला पुतळा अंबाडी ब्रीजवर लावण्यात आला होता. माणिकपूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून तो पुतळा जप्त (Aftab statue confiscated) करण्यात आला आहे. नेमका हा पुतळा कोणी लावला याची माहिती नसून त्याचा शोध घेत असल्याचे माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना सांगितले. latest news from Palghar, Palghar News

आफताबला भर चौकात फाशी द्या- बंबल या ऑनलाईन डेटिंग अँपच्या माध्यमातून एकत्र राहत असणाऱ्या वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या करणारा आरोपी आफताब पुनावाला याच्यावर खटला न चालवता त्याला भरचौकात फाशी द्या" या मागणीकरिता शिवसेना पालघर जिल्हा महिला आघाडीचे आज वसईत आक्रोश आंदोलन पार पडले. शिवसेना जिल्हासंघटक किरण चेंदवणकर ह्यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात शिवसेना महिला आघाडी उपस्थित होती. या दुर्दैवी घटनेतून मानवी विकृतीचा किळसवाणा प्रकार सर्वांसमोर आला आहे. संस्कार संस्कृतीला न जुमानता आपल्या नशेत राहणाऱ्या तरुणाईला या आणि अशा विचित्र घटनांमुळे दुर्दैवी पालकांना आणि अनुषंगाने समाजाला विचार करण्याची वेळआली आहे.

खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा- भयानकपणे वाढणारे माध्यमाचे व्यसन, फॅन, फॉलोअर्स, तरुणाईची नशा हे सर्व समाजासाठी घातक आहे. डेटिंग अँपमुळे वाढती जवळीकता स्वच्छंदी राहणारी तरुणाई, ह्याचा शेवट हा अशा निर्घृण हत्याकांडात होणारा आहे. त्यामुळे या प्रकारच्या सोशल माध्यमांच्या अँपवर बंदी घालावी. तसेच या प्रकरणातील क्रूर आरोपीस खटला न चालवता भर चौकात फाशी द्यावी तरच तरुणाई च्या या प्रकारच्या बेपर्वाईला आळा बसेल आणि श्रद्धाला न्याय मिळेल या मागणींकरिता शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज आक्रोश आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी केली आहे. तसेच या नराधमाला ही लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी देखील मागणी करण्यात आली. यापुढे राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.