ETV Bharat / state

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाच्या बँक खात्यतुन आफताबने काढले होते ५४ हजार रुपये...

author img

By

Published : Nov 17, 2022, 5:08 PM IST

श्रद्धा वालकर हत्याकांडात (Shraddha Walkar Murder Case) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी आफताब याने श्रद्धाच्या बँक खात्यामधून ५४ हजार रुपये काढल्याची माहिती समोर येत आहे. त्याने ही रक्कम कधी व कुठे काढली याचा तपास आता पोलीस करत असल्याचे समजत आहे.

Shraddha Walkar Murder Case
श्रद्धाच्या बँक खात्यतुन आफताबने काढले होते ५४ हजार रुपये...

नालासोपारा: वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) (२७) हिची दिल्ली येथे तिचा प्रियकर आफताब (२६) याने गळा दाबून हत्या केल्यावर शरीराचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी आफताब याने श्रद्धाच्या बँक खात्यामधून ५४ हजार रुपये (54 thousand rupees were withdrawn) काढल्याची माहिती समोर येत आहे.

श्रद्धाच्या बँक खात्यतुन आफताबने काढले होते ५४ हजार रुपये...

त्याने ही रक्कम कधी व कुठे काढली याचा तपास आता पोलीस करत असल्याचे कळते आहे. आफताबने श्रद्धाची हत्या ही दुसऱ्या तरुणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे केल्याचेही समोर येत आहे. आफताब हा दुसऱ्या तरुणीसोबत व्हाट्सअपवर चॅटिंग करायचा. त्याला श्रद्धाने विरोध दर्शवल्यानेही आरोपीच्या डोक्यात तिच्याबाबत राग असल्याने हे अघोरी कृत्य केल्याचेही बोलले जात आहे.

आफताबच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी आफताबच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी वसईत देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास फाशी दिलेला पुतळा अंबाडी ब्रीजखाली लावण्यात आला होता. माणिकपूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून तो पुतळा जप्त करण्यात आला आहे. नेमका हा पुतळा कोणी लावला याची माहिती नसून त्याचा शोध घेत असल्याचे माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले.

फास्ट ट्रॅकवर गुन्हा चालवण्याची मागणी श्रद्धाच्या मित्र व मैत्रिणीने सदर गुन्हा हा फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशी करण्याची मागणी केली आहे. तर काही मित्र व मैत्रिणींने या गुन्ह्याची सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.