ETV Bharat / state

NDRF Save Life of Workers : वैतरणा नदीच्या पुरात अडकलेल्या कामगारांना वाचविण्यात यश; एनडीआरएफची महत्त्वपूर्ण कामगिरी

author img

By

Published : Jul 14, 2022, 12:16 PM IST

हवामान खात्याने मुंबईसह बाजूच्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा ( Warning due to heavy rains ) दिला आहे. पालघरमध्ये ( In Palghar ) गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने रौद्र रूप धारण करून थैमान घातल्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले ( Disrupted Life due to heavy rains ) आहे. अशातच मुंबई- बडोदा महामार्गावरील ( Mumbai-Vadodara National Highway ) पुलाचे काम सुरू असताना वैतरणा नदीच्या पुरात ( Vaitrana River ) नदीला जीएम इन्फ्रास्ट्रक्चरचे १० कामगार अडकलेले होते.

NDRF's performance in flood affected workers
कामगारांना काढले पुरातून एनडीआरएफची कामगिरी

पालघर : पालघरमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने रौद्र रूप धारण करून थैमान घातल्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत ( Disrupted Life due to heavy rains ) झाले आहे. अशातच मुंबई- बडोदा महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना अचानक वैतरणा नदीला ( Vaitrana River ) आलेल्या पुरात मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरचे १० कामगार अडकलेले ( 10 Workers Trapped in Flood Vaitrana ) होते. या सर्व कामगारांना एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. एनडीआरएफसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस यांचेसह जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे कामगारांना वाचवण्यात यश आले.

कामगारांना काढले पुरातून एनडीआरएफची कामगिरी

सर्व कामगारांना काढले सुखरूप बाहेर : या घटनेची माहिती मिळतात एनडीआरएफचे पथक व पोलीस प्रशासन घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व त्यांनी वैतरणा नदीपात्रात अडकलेल्या दहा कामगारांची बोटीच्या साहाय्याने सुखरूप सुटका केली. सदरील कामगार 15 तास पुरात अडकले ( trapped in the flood for 15 hours ) होते. एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व कामगारांना पुरातून सुखरूप बाहेर काढले.


एनडीआरएफच्या जवानांचे कौतुक : या कामगिरीबद्दल एनडीआरएफच्या जवान, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस यांचे जिल्हा प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पालघरमध्ये आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. पालघरमध्ये पावसाने हाहाकार घातल्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पालघर जिल्ह्याला हवामान खात्याचा इशारा : हवामान विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसादरम्यान मरिन ड्राईव्हवरही उधाणाची भरती-ओहोटी दिसून आली. आयएमडीने पालघर पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा यापूर्वी दिला आहे.

वसई विरारलादेखील पावसाचा फटका : पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली आहेत. यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी असल्याने नागरिकांना मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणीच पाणी साचलेले पाहायला मिळाले आहे.

मुंबईच्या आजूबाजूच्या परिसराला हाय अलर्ट : आज मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत, तर काही ठिकाणी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा वाढल्याने नक्कीच दिलासादायक गोष्ट म्हणावी लागणार आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

हेही वाचा : Torrential Rains in Mumbai : मुंबईसह महाराष्ट्रात पुढील दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज

हेही वाचा : Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, आज होणार मंत्रिमंडळाची बैठक

हेही वाचा : Video : नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्याचा रुद्रावतार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.