ETV Bharat / state

तुळजाभवानी मंदिरात खासगी सुरक्षा रक्षकांची भाविकांना धक्काबुक्की

author img

By

Published : Oct 2, 2019, 11:36 PM IST

नवरात्रोत्सवादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिरात असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की सहन करावी लागत आहे.

भाविकांना धक्काबुक्की करताना सुरक्षा रक्षक

उस्मानाबाद - तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवला सुरवात झाली आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिरात असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की सहन करावी लागत आहे.

तुळजाभवानी मंदिरात भक्तांना मंदिरात असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की सहन करावी लागत आहे


नवरात्रोत्सवादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतूनही भाविक पायी चालत तुळजापूरला येतात. मात्र, एवढा प्रवास करून येथे आल्यानंतर खासगी सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की करून भाविकांना मंदिराच्या बाहेर ढकलले जाते.

हेही वाचा - सोलापुरात घोड्यावरून येऊन भरला उमेदवारी अर्ज; पोलीस दाखल करणार गुन्हा

दर्शन करू न देताच भाविकांना बाहेर काढले जाते. काही वेळा हे सुरक्षा रक्षक अपशब्दांचाही वापर करतात. त्यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. उर्मट सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Intro:तुळजाभवानी मंदिरात खाजगी सेक्युरिटी गार्डची भाविकांना धक्काबुक्की

उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नवरात्र मोहत्सवला सुरवात झाली मात्र तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिरात असलेल्या खाजगी सिक्युरिटी कडून धक्काबुक्की सहन करावी लागत आहे तुळजाभवानीचे नवरात्र उत्सव सुरू झाल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येतात त्याचबरोबर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतूनही भाविक पाई चालत तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल मात्र एवढा प्रवास करूनही येथे आल्यानंतर खाजगी सिक्युरिटी गार्ड कडून धक्काबुक्की करून मंदिराच्या बाहेर ढकललं जातं व काही वेळा दर्शन न करताच या लोकांना बाहेर काढलं जातं त्यामुळे भांडणाचे प्रकारही घडत असून उर्मट असलेले खाजगी कंपनीचे सिक्युरिटी गार्ड भाविकांना खालच्या भाषेत बोलायला ही वेगळी करत नाहीत त्यामुळे भाविक आतून नाराजी व्यक्त केली जात असून अशा अशिक्षीत व उर्मट सिक्युरिटी गार्ड यांच्या वरती कारवाई करून इतर भाविकांना असा त्रास होऊ नये अशी मागणी मंदिरात येणारे भाविक करत आहेत आज नवरात्रीचा चौथा दिवस असल्याने आजच्या दिवशी तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती त्यामुळे वरचेवर भाविकांची गर्दी वाढत असून या भाविकांना खाजगी सिक्युरिटी गार्ड च्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे


Byte भाविकBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.